शिक्षक नेते नाना जोशी यांना मातृशोक

नीरा : पोलीसनामा ऑनलाइन – नीरा (ता.पुरंदर) येथील महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीचे माजी राज्याध्यक्ष नाना जोशी याच्या मातोश्री सुशिला रामचंद्र जोशी ( वय- ८६) यांचे अल्पशा आजाराने
दुखःद निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

सुशिला जोशी या मनमिळावू स्वभावाच्या होत्या. त्यांच्या निधनाने सर्वञ हळहळ व्यक्त केली जात आहे. नीरा येथील जुन्या काळातील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक रामचंद्र जोशी यांच्या त्या पत्नी तर रायगडचे सेवानिवृत्त कामगार उपायुक्त शामकांत जोशी यांच्या त्या मातोश्री होत.