धक्कादायक ! 7 वीच्या विद्यार्थ्याकडून शिक्षिकेचा सपासप वार करून खून

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिक्षक आणि विद्यार्थ्याच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना मुंबईतल्या गोवंडी परिसरात घडली आहे. आईला सामान आणण्यासाठी शिक्षिकेकडे पैशांची मागणी केली. मात्र, पैसे देण्यास नकार दिल्याने 7 वी मध्ये शिकणाऱ्या 12 वर्षाच्या मुलाने शिक्षिकेवर चाकूनं सपासप वार करून खून केला. ही घटना सोमवारी सायंकाळी घडली असून मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आयेशा अस्लम हुसिये (वय-30) असे खून झालेल्या शिक्षिकेचे नाव आहे.

आयेशा हुसिये या गोवंडितल्या शिवाजीनगर परिसरात ट्युशन घेऊन आपले घर चालवतात. त्यांच्याकडे आरोपी मुलगा ट्युशनला येत होता. त्याने आयेशांकडे पैशांची मागणी केली. आपल्या आईला काही सामान आणायचे आहे त्यासाठी त्याने पैसे पाहिजे असल्याचे आयेशा यांना सांगितले. मात्र, आपल्याकडे पैसे नाहीत असे सांगितल्याने मुलाला राग आला. काही वेळाने तो पुन्हा त्यांच्याकडे आला आणि त्याने पैशांची मागणी करत वाद घातला.

आयेशा यांनी यावेळीही पैसे नसल्याचे सांगताच त्याने बरोबर आणलेल्या चाकूने त्यांच्यावर सपासप वार केले. अचानक झालेल्या हल्ल्यामध्ये आयेशा गंभीर जखमी झाल्या. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतले असून मुलाला अल्पवयीन असल्याने पोलिसांनी त्याला सुधारगृहात पाठवलं आहे. पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करीत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like