Teacher Raped Student | संतापजनक ! शिक्षकांकडून लज्जास्पद कृत्य, सहावीच्या विद्यार्थीनीवर शाळेतच केला बलात्कार, पीडित मुलगी झाली गरोदर

जोधपुर : वृत्तसंस्थाजोधपुर जिल्ह्यातील दोन शिक्षकांचे अतिशय लज्जास्पद कृत्य समोर आले आहे. येथील शेरगढच्या बालेसर पोलीस ठाण्याच्य हद्दीतील सरकारी शाळेच्या एका शिक्षकाने (teacher) शाळेतच सहावीच्या विद्यार्थीनीवर वारंवार रेप (Teacher Raped) केल्याने ती गरोदर राहिली (teachers raped sixth class student). आरोपी शिक्षकाने पीडित मुलीला तोंड उघडल्यास नापास करण्याची धमकी सुद्धा दिली होती. घाबरलेल्या आणि भेदरलेल्या विद्यार्थीनीने याबाबत कुणालाही काही सांगितले नाही. आरोपी शिक्षकाचा दुसरा साथीदार शिक्षक या वाईट कृत्यात त्याला साथ देत होता.

काही दिवसांपूर्वी जेव्हा विद्यार्थीनीची तब्येत बिघडली तेव्हा तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.
येथील डॉक्टरांनी विद्यार्थीनी गरोदर असल्याचे सांगताच तिच्या पालकांना प्रचंड धक्का बसला.
यानंतर पीडित मुलीने रडत-रडत शिक्षकांचे कृत्य सांगितले.
घटनेचा खुलासा झाल्यापासून दोन्ही आरोपी शिक्षक फरार आहेत.
पोलिसांनी दोघांच्या विरूद्ध पॉक्सो अ‍ॅक्टखाली गुन्हा दाखल केला आहे.
पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.
पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

आरोपी करायचा रेप, सहकारी शिक्षक देत असे पहारा

पोलिसांनी सांगितले की, ही घटना बालेसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेखाला गावातील आहे.
येथील सरकारी शाळेत सहावीच्या वर्गातील एका विद्यार्थीनीवर त्याच शाळेतील शिक्षक सूरजारामने मार्चमध्ये 3-4 वेळा शाळेतच रेप (Teacher Raped) केला होता.
आरोपी शिक्षक सुरजाराम जेव्हा-जेव्हा मुलीवर रेप करत असे.
तेव्हा-तेव्हा त्याचा सहकारी शिक्षक सहीराम बाहेर देखरेख करत असे.

पीडितेला ताप आल्यानंतर झाला खुलासा

घटनेचा खुलासा झाल्यानंतर पीडित मुलीच्या वडीलांनी बालेसर पोलीस ठाण्यात आरोपींविरूद्ध तक्रार दाखल केली आहे.
एफआयआर मध्ये पीडित मुलीच्या वडीलांनी सांगितले की, मुलीला ताप आल्याने तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो.
तिथे डॉक्टरांनी तपासून मुलगी गरोदर असल्याची माहिती दिली.
यानंतर मुलीने सर्वप्रकार कथन केला.

Mobile theft in Pune | दुचाकीवरून येऊन जबरदस्तीने मोबाईल हिसकाविणार्‍याला कोरेगाव पार्क पोलिसांकडून काही तासात अटक

Web Title : Teacher Raped Student jodhpur teachers raped sixth class student in school victim became pregnant