Raigad News : शिक्षक बनला हैवान, नापास करण्याची धमकी देऊन विद्यार्थिनीवर केले अत्याचार

रायगड : पोलीसनामा ऑनलाइन – गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी संतापजनक घटना रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात घडली आहे. जिल्हा परिषदेतील एका नराधम शिक्षकाने विद्यार्थिनीला नापास करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केले. या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून पालकांमधून संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी शिक्षकावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.

माणगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेवर मदन वानखेडे हा शिक्षक कार्यरत आहे. या शाळेत पीडित मुलगी शिकत असून तिची आई देखील शिक्षिका आहे. मदन वानखेडे हा पीडित अल्पवयीन मुलीवर 2016 पासून अत्याचार करीत होता. पीडित मुलीला तुला नापास करने आणि आईची नोकरी घालवेन, अशी देऊन नराधम शिक्षक तिच्यावर अत्याचार करत होता. अखेर नराधम शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून मुलीने न घाबरता आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार आईला सांगितला.

मुलीने तिच्यासोबत घडेलेल्या प्रकाराची माहिती दिल्यानंतर आईने मुलीसह माणगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली. पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरुन मदन वानखेडे याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. वानखडे याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी मदन वानखेडे याला अटक केली. त्याच्यावर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.