BEd धारकांसाठी खुशखबर ! आर्मी स्कूलमध्ये मोठी शिक्षक भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

पोलीसनामा ऑनलाईनः – देशातील विविध आर्मी पब्लिक स्कूलमध्ये (Army Public Schools) विविध विषयांच्या शिक्षक पदासाठी मोठी भरती केली जाणार आहे. आर्मी वेलफेअर एज्युकेशन सोसायटीने ही भरती काढली आहे. दि. 1 ऑक्टोंबरपासून अर्ज मागण्यास सुरुवात झाली आहे. उद्या 20 ऑक्टोंबर शेवटचा दिवस असून अद्याप अर्ज केला नसल्यास ही शेवटची संधी आहे. परिक्षा 21 आणि 22 नोव्हेंबरला घेतली जाणार आहे.

पदे
पोस्ट ग्रॅज्युएट टीचर ( (PGT)
ट्रेंड ग्रॅज्युएट टीचर (TGT)
म्युझिक टीचर (RGT)

विषय कोणते
इंग्लिशः पीजीटी व टीजीटी
हिंदी : पीजीटी व टीजीटी
संस्कृत : टीजीटी
मॅथः पीजीटी व टीजीटी
हिस्ट्री: पीजीटी व टीजीटी
जिऑग्राफी : पीजीटी व टीजीटी
इकॉनॉमिक्स : पीजीटी व टीजीटी
पॉलटिकल सायन्स : पीजीटी व टीजीटी
फिजिक्सः पीजीटी व टीजीटी
केमेस्ट्री : पीजीटी व टीजीटी
बायोलॉजी : पीजीटी व टीजीटी
बायोटेक्ऩालॉजी : पीजीटी
सायकोलॉजी :  पीजीटी
कॉमर्स : पीजीटी
कॉम्युटर सायन्स/ इकॉनामिक्स : पीजीटी व टीजीटी
होमसायन्स : पीजीटी
फिजिकल एज्युकेशन : पीजीटी

कोणत्या विषयासाठी किती जागा भरणार याची संख्या शाळेद्वारे जाहीर केली जाणार आहे.
AWESच्या सध्याच्या आकडेवारीनुसार, गेल्या दोन वर्षापासून 2315 आणि 2169 म्हणजेच 4448 एवढ्या जागा रिकाम्या आहेत. तर भरतीच्या जागा या जवळपास 8000 हजारावर जाण्याची शक्यता आहे.

शिक्षणाची अट काय
पीजीटीसाठी संबधित विषयाची मास्टर डिग्री आणि बीएड असणे गरजेचे आहे. तसेच कमीत कमी 50 टक्के गुणांनी या परीक्षा पास होणे आवश्यक आहे. टीजीटीसाठी संबधित विषयात पदवी आणि बीएड डिग्री, तसेच तसेच कमीत कमी 50 टक्के गुणांनी या परीक्षा पास होणे आवश्यक आहे. पीआरटीसाठी पदवी आणि बीएड किंवा दोन वर्षाचा डिप्लोमा (डीएलएड) किंवा चार वर्षाचा बीएड इंटेग्रेटेड उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. शुल्क सर्व जागांसाठी 500 रुपये शुल्क आकारले जात आहे.
लिंकः Army School Teacher Notification 2020- इथे क्लिक करा. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.