Teacher Recruitment | नववर्षात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मोठी भरती, सरकार एवढ्या जागा भरणार; जाणून घ्या

मुंबई: पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात लवकरच विद्यार्थ्यांची गैरसोय, शाळांची गरज लक्षात घेऊन 30,000 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती (Teacher Recruitment) केली जाणार आहे. राज्य शासन पातळीवर सध्या विद्यार्थ्यांची आधार जोडणी प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांची एकूण संख्या शिक्षण विभागाला कळेल. आणि त्यानुसार कोणत्या जिल्ह्यात शिक्षकांची गरज आहे, विद्यार्थ्यांची संख्या आणि शिक्षकांची उपलब्धता यादी यावरून शिक्षक भरती (Teacher Recruitment) घेतली जाणार आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ही माहिती दिली.

अर्थखात्याने देखील शिक्षकांच्या 80 टक्के भरतीला हिरवा झेंडा दाखवला आहे. त्यापैकी 50 टक्के पदे तातडीने भरण्याची प्रक्रिया सुरू करणार असल्याचे दीपक केसरकर म्हणाले आहेत. तसेच आम्ही राज्यातील कोणत्याही शाळा बंद करणार नाही. 20 विद्यार्थ्यांपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्यात येणार असल्याच्या निव्वळ अफवा आहेत. कोणीही त्यावर विश्वास ठेऊ नये, आम्हाला परवानगी मिळाली, तर 100 टक्के भरती प्रक्रिया राबवण्याची देखील आमची तयारी आहे. 31 डिसेंबर पर्यंत विद्यार्थ्यांच्या आधार जोडणीचे काम पूर्ण होईल. त्यानंतर एक महिना सर्व माहितीची छाननी होईल आणि 50 टक्के भरती ताबडतोब घेतली जाईल. या भरती प्रक्रियेत शिक्षक आणि शिक्षकेतर पदांसाठी भरती होईल, असेही यावेळी केसरकरांनी स्पष्ट केले.

20 पटसंख्येपेक्षा कमी विद्यार्थ्यांचा शाळा बंद करण्याचा शासनाचा मानस आहे, अशा अफवा आहेत.
लोकांचा काहीतरी गैरसमज झाला आहे. अशा शाळेंचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.
त्यामुळे सरकार या शाळा बंद करणार असल्याचा सर्वांचा समज झाला. पण तसे काही नाही.
ज्या शाळेत एक विद्यार्थी असेल, तेथे देखील शैक्षणिक वातावरण मिळू शकेल का, हा आमचा विचार आहे.
राज्यातील सर्व शाळकरी मुलांच्या भविष्याचा आम्ही विचार करत असून, दर्जेदार शिक्षण देणे,
ही आमच्या सरकारची प्राथमिकता आहे, असे केसरकरांनी नमूद केले.

Web Title :- Teacher Recruitment | winter session 2022 not closing schools having less than 20 studnets dipak keasarkar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mukta Tilak Funeral Update | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले आमदार मुक्ता टिळक यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन

Hina Khan | केसात गजरा अन् हातावर मेहंदी; हिना खानच्या देशी लूकने चाहत्यांना केले घायाळ

सर्व LIC धारकांसाठी महत्वाची सूचना! KYC करण्यापूर्वी वाचा ही बातमी, विमा कंपनीने जारी केली नोटीस