Pune : कौतुकास्पद ! तिसर्‍या मजल्यावर अडकली होती दीड वर्षाची मुलगी, स्वतःचा जीव धोक्यात घालून दोरीच्या साहाय्याने उतरत शिक्षिकेने केली सुखरूप सुटका

मांजरी : पोलीसनामा ऑनलाईन –  मांजरी ( Manjri) येथील शीतल महेंद्र नवले-पाटील ( Shital Mahendra Navle – Patil) या शिक्षिकेने स्वतः चा जीव धोक्यात घालून दोरीच्या साह्याने इमारतीच्या छतावरून तिसऱ्या मजल्यावरील घरात उतरत तेथे अडकलेल्या एका दीड वर्षाच्या मुलीची सुटका केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे कोणतेही शिक्षण कधी वायाला जात नाही” याचा प्रत्यय आज पुण्यात पाहायला मिळाला. या शिक्षिकेने या मुलाचा जीव वाचवताता महाविद्यालयीन जीवनात राष्ट्रीय छात्र सेनेत शिकलेल्या आपत्कालीन स्थितीत कसा मार्ग काढायचा याचा वापर करत या मुलाचे प्राण वाचवले.येथील गोपाळपट्टी जवळील चिलई रस्त्यावरील कमल पार्क येथे रोहिदास भांडवलकर ( Rohidas Bhadvalkar) यांचे चार मजली घर आहे. त्यातील तिसऱ्या मजल्यावर सुशांत यादव( Sushant Yadav) हे पत्नी व आराध्या या मुलीसह भाड्याने राहतात.

यावेळी यादव हे सकाळी कामावर गेले होते. यावेळी मुलीची आई कपडे सुकवण्यासाठी टेरेसवर गेली होती. यावेळी आत असणाऱ्या मुलीकडून घराची कडी आतमधून लावली गेली. त्यामुळे घाबरून ती रडू लागली. यावेळी त्यांनी समोरच्या शिक्षिका नवले यांच्याकडे त्यांना पतीला मदतीसाठी पाठवण्याची विनंती केली. पण त्यांचे पती घरी नसल्याने स्वतः शीतल या मदतीसाठी धावल्या.त्यांनी सुरूवातीला स्वत:च्या दहा वर्षाच्या मुलाला इमारतीच्या छतावरून दोरीच्या साह्याने तिसऱ्या मजल्यावरील गॅलरीमध्ये उतरविण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता.

मात्र, अवघड परिस्थिती असल्याने स्वत: शीतल यांनी तेथे जाण्याचा निर्णय घेतला. त्यांचे वजन पेलणारी रस्सी खाली राहणाऱ्या मालवाहू वाहनधारकांकडून घेऊन त्या इमारतीच्या छतावर गेल्या. कमरेला रस्सी बांधून त्या तिसऱ्या मजल्यावरील गॅलरीत प्रथम खिडकीचे लेंटल व नंतर खाली अशी कसरत करीत उतरल्या. घराचा गॅलरीतील दरवाजा उघडा होता. तेथून आत जाऊन रडणाऱ्या आराध्याला उचलून घेत तीला धीर दिला. आराध्याकडून आतील बाजूची लागलेली कडी उघडून तिला आईच्या ताब्यात दिले. दरम्यान, इमारती खाली जमा झालेल्या नागरिकांनी शीतल यांच्या धाडसाचे कौतूक करीत अभिनंदन केले. आराध्याच्या कुटुंबानेही त्यांचे आभार मानले.

दरम्यान, शीतल पाटील या कर्वे शिक्षण संस्थेत शिक्षिका म्हणून काम करत आहेत. मुळच्या शिरूरच्या असलेल्या शीतल यांनी कर्वे संस्थेच्या वसतिगृहात राहून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. या घटनेविषयी बोलताना त्यांनी “दुसऱ्यांना मदत करण्याचे आई वडिलांकडून झालेले संस्कार व कर्वे संस्थेने दिलेले धडे यामुळे मी हे धाडस करू शकले. अपुऱ्या सामुग्रीच्या आधारावर मी आराध्याची सोडवणूक करू शकले याचा मला आनंद होत असल्याचे म्हटले. त्यामुळे त्यांच्या या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like