भरदिवसा शिक्षकाचा खून झाल्यानंतर एकानं बीड SP ऑफिसमध्येच केला आत्मदहनाचा प्रयत्न (व्हिडीओ)

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील जयदत्त क्षीरसागर यांच्या सैनिक विद्यालयातील शिक्षकाचा दिवसाढवळ्या भोसकून खून केल्याची घटना गुरुवारी (दि.19) दुपारी तीनच्या सुमारास बालेपीर भागात घडली होती. या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात आज गोंधळ घातला. दरम्यान, एकाने अंगावर रॉकेल ओतून आत्महदन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत त्याला ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

सय्यद साजेदअली मिर अन्सारअली असे खून झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी अन्वरखान उर्फ गुज्जरखान, सय्यद नासेर सय्यद नूर, सय्यद शाहरुख सय्यद नूर, उबेद, शेख सर्फराज उर्फ सरू डॉन, इम्रान पठाण उर्फ चड्डा, पठाण मुजीबखान मिर्झाखान, शेख शहबाज शेख कलीम, शेख अमर शेख, शेख बबर युनूस, आवेज काझी, शेख इमरान उर्फ काला इमरान शेख रशीद, शेख मजहर उर्फ हाफमर्डर शेख रहीम असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

आत्महदहन प्रकरणानंतर कौसर मोमीन व इतर नातेवाईकांनी उपविभागीय पोलीस अधीक्षक भास्कर सावंत व शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे शिवलाल पुरभे यांच्याशी चर्चा केली. दरम्यान या प्रकरणातील तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, जो पर्य़ंत मुख्य आरोपी अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे. मृतदेह 21 तासापासून जिल्हा रुग्णालयातच असून या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण आहे. मृतदेहावर आज सायंकाळी पाचच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Visit – policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like