ट्रेनिंग देणाऱ्यांच्या खुर्च्या रिकाम्या

भोकर : पोलीसनामा ऑनलाईन 

मानव संसाधन विकास मंत्रालय आणि NCERT यांनी कै.लक्ष्मणराव घिसेवाड हायस्कूल ,भोकर येथे शिक्षक उद्बोधन प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला आहे . मात्र प्रशिक्षकच येत नसल्याने कार्यक्रमाचे नियोजन कोलमडले आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’120c798b-cc74-11e8-a4d1-dd62519890cd’]

मानव संसाधन विकास मंत्रालय आणि NCERT यांच्याद्वारे महाराष्ट्र राज्यात उच्च प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील अध्ययन , अध्यपनाचा दर्जा उंचावणे , इयत्ता निहाय  गुणवत्ता वाढवणे या प्रमुख उद्देशाने महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व परिषद(विद्या प्राधिकरण) पुणे यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील राज्य मंडळाच्या अभ्यासक्रम राबविण्याऱ्या सर्व माध्यमिक शाळांमधील मुख्याध्यापक व विषयानुसार शिक्षक यांचे प्रशिक्षण दि ०८ ते १३ ऑक्टोबरच्या कालावधीत  कै.लक्ष्मणराव घिसेवाड हायस्कूल ,भोकर येथे आयोजित केले आहे . दररोज सकाळी १० वाजता ते २ पर्यंत चालणाऱ्या या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी प्रशिक्षक वेळेत येत नसल्याने शिक्षक व मुख्याध्यापक यांचे हॉल मध्ये बसून हाल झाले आहे.

खाकीतील नवदुर्गा; महिला पोलिसाच्या तत्परतेनं वाचले सहकाऱ्याचे प्राण

या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक व शिक्षक यांना सकाळी १० वाजता येणे बंधनकारक आहे. वेळेत न येणाऱ्या मुख्याध्यापक व शिक्षकावर कारवाईची पत्रके काढण्यात आली आहे. परंतु वेळेवर न येणाऱ्या प्रशिक्षकावर कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही . प्रशिक्षनास नयेणाऱ्या प्रशिक्षकावर शिक्षण अधिकारी काय कारवाई करण्यात येईल याकडे सर्वांचे लक्ष वेधून आहे.

या प्रकाराविषयी शिक्षाधिकाऱ्याकडे विचारणा केली असता प्रशिक्षक हे नांदेडहून ये-जा करतात त्यामुळे त्यांना उशीर होतो अशा शब्दात सारवासारव करण्यात करण्यात आली .

[amazon_link asins=’B07BCGC13F,B0757K3MSX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’39fcc778-cc74-11e8-a90d-51290b2951d7′]