उंची मोजण्याच्या बहाण्याने विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला अटक

मुंबई : पोलीसनामा आॅनलाइन – विद्यार्थी पर्यायाने समाज घडविण्याचे काम शिक्षक करत असतो, असे सांगितले जाते. त्यामुळेच आई वडिलानंतर शिक्षकाला मान दिला जातो. पण सध्याच्या बदलत्या जीवन शैलीचा गुरुजनांवरही विपरित परिणाम झाला असून त्याच्याकडूनही आता मुली अत्याचाराच्या बळी ठरण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. शिकवणीसाठी येणाऱ्या अल्पवयीन मुलींचा विनयभंग करण्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढतच जात आहे.

उंची मोजण्याच्या बहाण्याने विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा प्रकार जोगेश्वरीच्या खासगी शिकवणीत घडला. या प्रकरणी ओशिवरा पोलिसांनी तेथील शिक्षकावर पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

रेहान अब्दुल रेहमान अन्सारी (४६) असे अटक केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. तो बेहरामबागमध्ये एच. आर. कोचिंग क्लासेस नावाने खासगी शिकवणी घेतो. १६  वर्षाची मुलगी अंधेरीत राहत असून, अन्सारीकडे शिकवणीसाठी जायची. मंगळवारी संध्याकाळी ६च्या सुमारास अन्सारीने या मुलीला भेटण्यासाठी त्याच्या कार्यालयात बोलावले. काही वेळ गप्पा मारल्यानंतर तिची उंची मोजण्याच्या बहाण्याने तिचा टी शटर वर करत, अश्लील चाळे केले. घाबरलेल्या या मुलीने आरडाओरड करण्याचा प्रयत्न करताच अन्सारीने तिचे तोंड दाबले. कशीबशी त्याच्या तावडीतून सुटून ही मुलगी घरी पोहोचली. त्यानंतर ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहितला धक्का, याचिकेला स्थगिती देण्यास नकार