काय सांगता ! होय, चक्क शिक्षिका चालवत होती सेक्स रॅकेट, अपार्टमेंटमधील सुखवस्तू कुटूंबात सुरु होता गोरखधंदा

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाईन – शहरातील जसराणा अपार्टमेंटमधील एका सुखवस्तू कुटूंबात चालणा-या कुंटणखान्याचा पर्दाफाश करण्यात यवतमाळ शहर पोलिसांना यश आले आहे. रविवारी रात्री छापा टाकून पोलिसांनी ही कारवाई केली. तेंव्हा हा कुंटणखाना चक्क शिकवणी वर्ग घेणारी एक शिक्षिकाच चालवत असल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकाराने काहीकाळ पोलिसांचाही गोंधळ उडाला होता.

या प्रकरणी कुंटनखाना चालविणा-या शिक्षिका महिलेसह, रामकृष्णराव म्हस्के (वय 42 रा. सिंचनगगर) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर देहविक्रीसाठी आणलेल्या 40 वर्षीय महिलेची सुटका केली आहे.

जसराणा अपार्टमेंटमधील तिसऱ्या मजल्यावरच्या फ्लॅटमध्ये कुंटणखाना चालू असल्याची माहिती ठाणेदार धनंजय सायरे यांच्या पथकाला मिळाली. होती. त्यावरून पाेलिसांनी बनावट ग्राहक बनवून तिथे पाठवला. या डमी ग्राहकाने पाचशे रुपयांच्या तीन नोटा संंबंधित महिलेला दिल्या. त्यानंतर त्या ग्राहकाने दबा धरुन बसलेल्या पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी तात्काळ त्या फ्लॅटमध्ये धाड टाकत कुंटणखाना चालविणारी शिक्षिका, रामकृष्णराव मस्के याला ताब्यात घेतले. तर देहविक्रीसाठी आणलेल्या 40 वर्षीय महिलेची सुटका केली आहे.

कुंटणखाना चालविणारी महिला ही शिक्षिका असल्याचे सांगण्यात आले. तिलाही 17 वर्षांची मुलगी असून ही मुलगी घरात असतानाच देहविक्रीचा व्यवसाय सुरु असल्याचे वास्तव कारवाईतून समोर आले आहे. याशिवाय नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक बी. जी. कऱ्हाळे यांनी मैथिलीनगर येथील कुंटणखान्यावर धाड घातली. तेथेही मुलीकडून देहव्यापार करून घेतला जात होता. पोलिसांच्या चार पथकांनी विविध ठिकाणी धाडी टाकल्या. नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक विलास चव्हाण, बी. जी. कऱ्हाळे यांच्यासह फौजदार किशोर वाटकर, दर्शन दिकोंडवार, अवधूतवाडी ठाणेदार आनंद वागतकर यांच्या पथकाने कारवाई केली. दरम्यान ज्या नियोजित कुंटणखान्यासाठी ग्राहक पाठविला होता, तो बंद होता. मात्र तिसऱ्या मजल्यावर सुखवस्तू कुटुंबातच कुंटणखाना सुरू असल्याचे स्पष्ट झाले.