पहिलीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला मुख्याध्यापकाकडून बेदम मारहाण

राजगुरूनगर : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर येथे मुख्याध्यापकाने पहिलीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याना बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी खेड पोलिसात शिक्षक लक्षण कडलग याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार पुढील तपास सुरू आहे. समीर रणदिवे असे  मारहाण झालेल्या विद्यार्थांचे नाव असून त्याच्या पाठीवर मारहाणीचे व्रण उमटले आहेत.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e5e7cf80-d052-11e8-9665-c71a7d30630c’]

मिळालेल्या माहितीनुसार,पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर येथील जिल्हा परिषद शाळेत पहिलीतील विद्यार्थ्याला मुख्याध्यापकाने मारहाण केली आहे. मुख्याध्यापक लक्ष्मण कडलग हे वर्गाच्या बाहेर गेल्यानंतर पहिलीच्या वर्गातील विद्यार्थानी जोरजोरात बाकडा वाजवत होते. याचाच राग मुख्याध्यापक लक्षण कडलग यांना राग अनावर झाला आणि त्यांनी विद्यार्थाना मारले,यात सहा वर्षीय समीर याच्या पाठीवर व्रण उमटले आहेत.या घटनेची माहिती समीरने आई वडिलांना दिली त्यानंतर त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जाण्यात आले. दरम्यान याप्रकरणी मुख्याध्यापक लक्ष्मण कडलग याच्या विरोधात विद्यार्थ्यांच्या आईने खेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

[amazon_link asins=’B017WDVV3M,B06XN6BY5V’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5e01a918-d053-11e8-8a12-5f3c1b43d8c7′]