Teachers Character Verification Certificate | विद्यार्थी सुरक्षेसाठी शिक्षण विभागाचा मोठा निर्णय ! आता शिक्षकांची होणार चारित्र्य पडताळणी

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – Teachers Character Verification Certificate | विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शालेय शिक्षण विभागाने (Department of School Education) एक मोठा निर्णय घेतला आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून शिक्षक, प्रशासक, कर्मचारी, शिपाई यांची चारित्र्य पडताळणी (Teachers Character Verification Certificate) करणार आहे. लवकरच त्याबाबत शाळांना आदेश देण्यात येतील, त्याचबरोबर आदेशाची अंमलबजावणी कशी होते त्याकडे शिक्षण विभाग लक्ष देईल, अशी माहिती शिक्षण आयुक्त सूरज मांढरे (Education Commissioner Suraj Mandhare) यांनी दिली.
शिक्षण आयुक्त सूरज मांढरे बुधवारी औरंगाबाद (Aurangabad) दौऱ्यावर होते. त्यावेळी ते म्हणाले, ”खासगी शाळांमध्ये नव्या सत्रात शिक्षकांची नेमणूक होते. अशा वेळी तेथे नेमणूक करण्यात येणारा शिक्षक, त्याची इत्थंभूत माहिती संस्थेकडे असावी, त्याच्यावर काही पूर्वी गुन्हा दाखल नाही ना, याबाबत माहिती घेतली जाईल. शाळांमध्ये बसविण्यात येणारे सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित आहेत की नाही, अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापरही विद्यार्थी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शाळांनी करावा याबाबतही सूचना देण्यात येतील.”
दरम्यान, विद्यार्थी सुरक्षेच्या मुद्द्यावर शाळांच्या कारभारावर सवाल उठत असताना शिक्षण विभाग शाळांवर काय कारवाई करतो, असा प्रश्न देखील पालकांतून उपस्थित होत आहे. त्यामुळे शिक्षण विभाग शिक्षकांचे कॅरेक्टर तपासणी करण्याचा विचार करत आहे. त्याबाबतची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक वर्षापासून होईल. असं सांगण्यात येत आहे. दरम्यान, नवे शैक्षणिक वर्ष जूनमध्ये सुरू होत असून त्यावेळीच हे बदल करण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे.
Web Title : Teachers Character Verification Certificate | now there will be a character verification certificate of teachers big decision of education department for student safety
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर
लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल –
विक्रम कुमार, महापालिका आयुक्त