संतापजनक ! ‘त्या’ 2 ‘बहाद्दर’ शिक्षकांनी भर वर्गातच घेतलं बलात्काराचं ‘प्रात्यक्षिक’, ‘डेमो’ दरम्यान मुलगी जखमी

विजयवाडा : वृत्तसंस्था – एखादी गोष्ट विद्यार्थ्यांना नीट समजावी म्हणून शिक्षकांकडून वर्गात प्रात्यक्षिक दाखविले जाणे सामान्य बाब आहे. प्रात्यक्षिकांद्वारे आणि उदाहरणांद्वारे शिकवणारा शिक्षक उत्तम मानला जातो. मात्र प्रात्यक्षिकाच्या नादात आंध्र प्रदेशाच्या विजयवाडा येथील दोन शिक्षकांकडून धक्कादायक कृत्य घडले आहे. या शिक्षकांनी मुलांना डेमो म्हणून चक्क बलात्काराचे प्रात्यक्षिक करून दाखवल्याने खळबळ उडाली आहे.

बलात्कार म्हणजे नेमकं काय असतो आणि तो कसा केला जातो हे दाखविण्यासाठी या शिक्षकांनी मुलांना अभिनय करायला लावून वर्गातच बलात्काराचा देखावा उभा केला होता. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर काही पालकांनी या शिक्षकांवर हल्ला केला होता. त्यामुळे तीन मुलांच्या भांडणांमध्ये एक मुलगी जखमी झाल्याचा आणि शिक्षकांना मारहाण केल्याची तक्रार शैक्षणिक मंडळाकडे दाखल करण्यात आली होती. त्याचा तपास करताना हे धक्कादायक कृत्य समोर आले.

प्रात्यक्षिकादरम्यान मुलगी झाली जखमी

तीन विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी झाल्याची तक्रार शैक्षणिक मंडळाकडे दाखल करण्यात आली होती. यामध्ये दोन विद्यार्थी तर एका विद्यार्थिनीचा समावेश होता. ही मुलगी जखमी झाल्याने सखोल चौकशी केली असता याच खरं कारण समोर आलं. या तीन विद्यार्थ्यांना बलात्काराचं प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी अभिनय करण्यासाठी निवडण्यात आलं होतं. त्यानंतर हे प्रात्यक्षिक चालू असताना ही मुलगी जखमी झाल्याची संतापजनक बाब समोर आली आहे.

शाळेने मात्र ही बाब मान्य केलेली नसून मुलांच्या झालेल्या किरकोळ भांडणात ही मुलगी जखमी झाली असल्याचं सांगितलं. तालुका अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या अहवालात देखील अशी कोणतीही घटना घडलेली नसल्याचे सांगितले. जिल्हा शिक्षण अधिकारी सी. व्ही. रेणुका यांनी मात्र वर्गात नेमकं काय घडलं यासंबंधी ‘प्रथमदर्शनी मूल्यांकन’ करण्यासाठी शनिवारी शाळेत भेट घेणार असल्याचं स्पष्ट केलं.

शिक्षण मंडळाने या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले असून प्रकरणात तथ्य आढळल्यास शिक्षकांवर कठोर कारवाई करणार असल्याचं सांगितलं. पालकांकडून मात्र अशा प्रकारामुळे प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

आरोग्यविषयक वृत्त

 

You might also like