Nashik News : अपघातग्रस्त पोलिसाच्या मदतीला धावले शिक्षक

बोरगाव : पोलीसनामा ऑनलाइन – अपघातात गंभीर जखमी पोलिस कर्मचार्‍याच्या मदतीला शिक्षक धावून आले. अन् यातून माणुसकीचे एक उत्तम उदाहरण समोर आले.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेजवळ बुधवारी (दि. 20) सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास नाशिक येथे मुख्यालयामध्ये कार्यरत असलेले पोलिस कर्मचारी पंडित आनंदा आहेर (वय 37, रा. जामुने (भो.) हे सुरगाणा येथून बाजार घेऊन दुचाकीने घरी परतत असताना उंबरठाण रस्त्यावर त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. यात ते गंभीर जखमी झाले. त्याचवेळी जिल्हा परिषदेचे शिक्षक रतन चौधरी यांना मदतीसाठी माधव झिरवाळ यांनी फोन केला.

चौधरी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त जखमी पोलिसाला सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात पोहचविले. वैद्यकीय अधिकारी श्रीकांत कोल्हे, परिचारिका अनिता पोतदार यांनी उपचार केले.