Teachers Recruitment In Maharashtra | टीईटी गैरप्रकार प्रकरणातील उमेदवारांना संधी, स्व-प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Teachers Recruitment In Maharashtra | राज्यातील शिक्षक भरतीसाठी अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी 2022 ही परीक्षा दिलेल्या उमेवारांची पवित्र पोर्टलवर स्व-प्रमाणपत्र नोंदणीची प्रक्रिया सुरु आहे. उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशानुसार टीईटी परीक्षेत गैरप्रकार (TET Scam) प्रकरणातील उमेदवारांना स्व-प्रमाणपत्र सादर करण्याची संधी दिली जाणार आहे. पवित्र संकेतस्थळावर नोंदणी (Registration Via Pavitra Portal) करण्यासाठी शिक्षणविभागाने पुन्हा 30 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे (TET Paper Leak Case). गैरप्रकार केलेल्या उमेदवारांना संधी दिल्याने प्रामाणिक उमेदवारांवर अन्याय होत असल्याची नाराजी उमेदवारांकडून व्यक्त केली जात आहे. (Teachers Recruitment In Maharashtra)

शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) 2018 आणि 2019 मध्ये गैरप्रकार केल्यामुळे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने नऊ हजारांपेक्षा अधिक उमेदवारांना प्रतिबंधित केले होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने त्यांना शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी 2022 ला प्रविष्ठ होता येणार नसल्याचा निर्णय दिला होता. त्यामुळे या उमेदवारांना पवित्र संकेतस्थलावर शिक्षक भरती नोंदणी प्रक्रियेत सहभागी करुन घेतले नव्हते. (Teachers Recruitment In Maharashtra)

परंतु, उच्च न्यायालयाने या उमेदवारांकडून आवश्यक त्या बाबींची पूर्तता होत असल्याची खात्री समन्वयक अधिकाऱ्यांनी केली. त्यानंतर स्व-प्रमाणन करण्याची सोय उपलब्ध करुन देण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार प्राप्त होणाऱ्या अर्जांची छाननी करुन पात्रता निश्चित करण्याची कार्यवाही समन्वयक अधिकारी करणार आहेत. यासाठी लागणारा वेळ विचारात घेऊन स्व-प्रमाणपत्र नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ दिल्याची माहिती शिक्षण विभागाने परिपत्रकाद्वारे दिली आहे.

प्रामाणिक उमेदवारांवर अन्याय

टीईटी परीक्षेत गैरप्रकार केल्यामुळे प्रतिबंधित केलेल्या उमेदवारांना कोर्टाच्या आदेशानुसार स्व-प्रमाणपत्राची संधी
देऊन भरती प्रक्रियेत सहभागी करुन घेतले जाणार आहे. परंतु गैरप्रकार करणाऱ्या उमेदवारांना संधी दिल्याने
प्रामाणिक उमेदवारांवर अन्याय होत असल्याची नाराजी उमेदवारांकडून व्यक्त केली जात आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MP Supriya Sule | ‘ते वक्तव्य अजित पवारांना उद्देशून नव्हतं’ सुप्रिया सुळेंनी केला खुलासा (व्हिडिओ)