सामन्यादरम्यान सर्वांचं लक्ष वेधून घेणाऱ्या टीम इंडियाच्या ‘सुपरफॅन’चं निधन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – २०१९ मध्ये भारतीय क्रिकेट संघ इंग्लड येथे गेला होता. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत धडक मारली होती. या सामान्यांच्या दरम्यान प्रेक्षकांच्यात बसलेल्या एका आजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्या बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात चर्चेत आलेल्या ८७ वर्षीय आजी टीम इंडियाला सपोर्ट करण्यासाठी आल्या होत्या. त्यांचा उत्साह एखाद्या तरूणीला लाजवेल इतका होता. ‘चारुलता पटेल’ असे या आजींचे नाव. मात्र १३ जानेवारी रोजी या टीम इंडियाच्या फॅनचे निधन झाले. चारुलता यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून त्यांच्या नातीनं ही बातमी दिली.

कॅप्टन कोहलीने घेतली होती भेट – 
वर्ल्ड कप स्पर्धेतील बांगलादेशविरुद्धचा सामना पाहण्यासाठी चारुतला या स्टेडियमवर आल्या होत्या आणि त्यावेळी कर्णधार विराट कोहलीसह अन्य खेळाडूंनीही त्यांची भेट घेतली होती. आणि त्यांचा आशीर्वादही घेतला होता. त्यामुळेच त्या सामन्यानंतर चारुलता पटेल यांची खूप चर्चा रंगली होती. तसेच बांगलादेशनंतरच्या सामन्याचे तिकीट देणार असे कोहलीने चारुलता पटेल यांना कबुल केले होते. कोहलीने तो शब्द पाळला देखील होता. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्याचे तिकीट कोहलीने चारूलता यांना दिले होते. त्या सामन्यानंतरही सोशल मीडियावर चारुलता पटेल यांचीच चर्चा रंगली होती.

Charulata Patel

चारुलता यांच्या नातीने केले ट्विट
चारुलता यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून त्यांच्या नातीनं त्यांच्या निधनाची बातमी दिली. तिने ट्विट केले आहे की, “तुम्हाला कळवण्यात दुःख होतं की, आमच्या आजीने १३ जानेवारीला सायंकाळी साडे पाचच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला”, अशी माहिती त्यांच्या नातीने दिली.

बीसीसीआयने केले ट्विट
बीसीसीआय ने देखील चारुलता यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे. “टीम इंडियाच्या सुपरफॅन चारुलता पटेलजी नेहमीच आपल्या हृदयात राहील आणि त्यांची खेळाबद्दलची आवड आम्हाला सतत प्रेरित करीत राहील”, अशा आशयाचे ट्विट बीसीसीआय ने केले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like