T-20 World Cup | ट्वेन्टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा ! संघात महत्त्वाचे बदल, जाणून घ्या कोणाला मिळाली संधी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  युएईमध्ये (UAE) होणाऱ्या ट्वेंन्टी-20 विश्वचषकासाठी (T-20 World Cup) आज (बुधवार) अखेर भारतीय संघाची घोषणा (Indian team announce) करण्यात आली आहे. संघाच्या घोषणेनंतर अनेक जणांना धक्के बसले आहेत. कारण भारतीय संघामध्ये यावेळी महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. ट्वेंन्टी-20 विश्वचषकासाठी (T-20 World Cup) कर्णधारपद विराट कोहलीकडे (Virat Kohli) कायम ठेवण्यात आले आहे. तर सलामीला रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या सोबत विराट कोहली किंवा लोकेश राहुल (Lokesh Rahul) साथ देऊ शकतात.

ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या आयसीसी टी-20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा आज करण्यात आली. कोरोनाच्या माहामारीमुळे ही स्पर्धा भारता ऐवजी युएई आणि ओमानमध्ये (Oman) खेळवली जाणार आहे. वर्ल्डकपसाठी करण्यात आलेल्या ग्रुप बी मध्ये भारताचा समावेश आहे. या ग्रुपमध्ये भारतासह पाकिस्तान (Pakistan), न्यूझीलंड (New Zealand), अफगाणिस्तान (Afghanistan) आणि पात्रता फेरीतील दोन संघ असणार आहेत. या गटातील पहिला सामना 24 ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान या दोन संघात होणार आहे. ही लढत दुबईत होणार आहे. या गटातील अखेरचा सामना देखील भारताच्या सामन्याने होणार आहे. 8 नोव्हेंबर रोजी भारत पात्रता फेरीतील दुसऱ्या क्रमांकाच्या संघासोबत लढेल.

भारताच्या लढती

24 ऑक्टोबर – पाकिस्तान
31 ऑक्टोबर – न्यूझीलंड
3 नोव्हेंबर – अफगाणीस्तान
5 नोव्हेंबर – पात्रता संघाविरुद्ध
6 नोव्हेंबर – पात्रता संघाविरुद्ध

भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार), रोहीत शर्मा (उपकर्णधार), के.एल. राहुल, सुर्यकुमार यादव, रिशभ पंत (विकेट किपर), इशान किशन (विकेट किपर), हार्दीक पांड्या, रविंद्र जडेजा, राहुल चहर, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहमद सामी.

 

Web Title : team india announced squad for t 20 world cup

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Municipal Corporation | पालिकेच्या अर्थव्यवस्थेवर घाव अन् भाजपचा रडीचा डाव, राष्ट्रवादीचा घणाघात

Vegan Diet | FSSAI ने ‘वेगन’ फूडसाठी बनवले विशेष रेग्युलेशन, लोकांना ताबडतोब ओळखता येणार

Pune Court | भाजप नगरसेवक धीरज घाटे यांच्या खुनाच्या कटातील तिघांना शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी, जाणून घ्या कोर्टात काय झालं