भारताला धक्का ! Word Cup २०१९ सुरु होण्यापूर्वीच क्रिकेट संघात होऊ शकतो ‘हा’ मोठा बदल

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – क्रिकेटच्या कुंभमेळ्याला अवघे १४ दिवस शिल्लक असताना भारतीय संघाची चिंता वाढवणारी गोष्ट समोर आली आहे . यावेळी क्रिकेटचा हा कुंभमेळा क्रिकेट पंढरी इंग्लंडमध्ये खेळवला जाईल. सर्व संघांनी त्यासाठी जोरदार तयारी केली आहे. इंग्लंडच्या थंड वातावरणात खेळणे भारतीय संघासाठी नक्कीच सोपी गोष्ट नाही. जगभरातील १० प्रमुख संघाचा या विश्वकपात समावेश आहे.

याचदरम्यान, एक मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय संघासाठी एक चिंता करणारी गोष्ट समोर आली आहे. भारतीय संघात समावेश असणारा अष्टपैलू खेळाडू केदार जाधव हा आयपीयलमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळत असताना जखमी झाला. त्यामुळे त्याला उर्वरित आयपीयलमधून देखील बाहेर पडावे लागले.

मात्र आता त्याचा समावेश भारतीय संघात असल्याने तो लवकर बरा होईल कि नाही यांच्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. त्याच्याकडे नीट होण्यासाठी अजून एक आठवडा बाकी आहे, मात्र सूत्रांच्या माहितीनुसार तो पहिल्या सामन्यापर्यंत बरा होण्याची शक्यता नाही. त्यामुळे त्याच्या जागी कुणाला खेळवायचे याची चर्चा सुरु झाली आहे.

दरम्यान, त्याच्या जागी रिषभ पंत याला खेळवण्याचा विचार निवड समिती आणि संघ व्यस्थापन करत असल्याचे समजते. याअगोदर देखील विश्वकप संघात त्याची निवड न झाल्याने त्याच्या चाहत्यांनी निवड समितीवर टीका केली होती. या विश्वकपमध्ये भारत, इंग्लंड,ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिका हे विजेतेपदाचे प्रबळ दावेदार म्हणून समजले जात आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like