PM मोदी आणि ओबामांच्या सुद्धा पुढे गेला विराट, ‘या’ ठिकाणी पोहचणारा जगातील पहिला क्रिकेटर

नवी दिल्ली : वृत्त संस्था – भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली (Virat kohli) खेळाच्या मैदानात विक्रम करत असतोच, पण यावेळी सोशल मीडियाच्या जगतात सुद्धा त्याने इतिहास रचला आहे. कर्णधार कोहली(Virat kohli) जगातील पहिला क्रिकेटर आणि आशियाचा पहिला सेलेब्रिटी बनला आहे ज्याचे इंस्टाग्रामवर 125 मिलियन म्हणजे 12 कोटीपेक्षा जास्त फॉलोवर्स झाले आहेत. 31 वर्षाच्या या खेळाडूने आतापर्यंत एकुण 1175 पोस्ट केल्या आहेत. तर, इंस्टाग्रामवर तो केवळ 201 लोकांना फॅालो करतो.

पीएम मोदींच्या सुद्धा पुढे गेला विराट
विराट कोहली सोशल मीडियावर नेहमी छायाचित्रे पोस्ट करत असतो.
लोक या आपल्या आवड्या खेळाडूची प्रत्येक पोस्ट पसंत करतात.
पण आता विराटने सोशल मीडियाच्या जगतात एक असे ठिकाण गाठले आहे,
जे यापूर्वी कुणी गाठू शकलेले नाही.

इंस्टाग्रामवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फॉलोअर्सची संख्या सुद्धा 56 मिलियनच आहे. तर माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे 34.9 मिलियन फॉलोअर्स आहेत. विराट कोहलीची पत्नी आणि बॉलीवुड अ‍ॅक्ट्रेस अनुष्का शर्माचे इंस्टाग्रामवर 50.3 मिलियन फॉलोअर्स आहेत.

रोनाल्डो आणि मेसीच्या पाठीमागे विराट
विराट कोहलीच्या शिवाय कुणीही क्रिकेटर इंस्टाग्रामवर 100 मिलियनच्या क्लबमध्ये सहभागी नाही. विराटच्या शिवाय द रॉक नावाने प्रसिद्ध अभिनेता ड्वेन जॉन्सन, फुटबॉलर क्रिस्टियानो रोनाल्डो, नेमार आणि लियोनेल मेसी या क्लबमध्ये सहभागी आहेत. याशिवाय यामध्ये बेयॉन्से आणि एरियाना ग्रँड या एलीट क्लबमध्ये सहभागी आहेत.

इंस्टाग्रामवर विराटच्या पुढे केवळ तीन खेळाडू आहेत. इंस्टाग्रामवर रोनाल्डोच्या फॉलोवर्सची संख्या सर्वात जास्त आहे. रोनाल्डोला 290 मिलियनपेक्षा जास्त लोक फॉलो करतात. त्यानंतर मेसीचा नंबर येतो, मेसीला 200 मिलियनपेक्षा जास्त लोक फॉलो करतात. तर तिसर्‍या नंबरवर ब्राझीलचा नेमार आहे. नेमारचे फॉलोवर्स 151 मिलियन आहेत.

हे देखील वाचा

कामाची गोष्ट ! Aadhaar चं मोबाइल अँप देईल 35 पेक्षा जास्त सुविधा; UIDAI नं लाँच केलं mAadhaar चं नवं ‘व्हर्जन’, जाणून घ्या

धक्कादायक ! भाजप नेत्याचे मॉडेलसोबतचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल, प्रचंड खळबळ

‘या’ आजारांची भीती वाटतं असेल तर ‘हे’ १६ उपाय नक्की करा ;  जाणून घ्या

तणाव आणि चिंतेमध्ये जगत असाल, तर दररोजच्या नित्यकर्मामध्ये ‘हे’ 3 व्यायाम सामील करा
तसेच फेसबुक पेज ला लाईक करा


ट्विटर ला देखील फॉलो करा