विराट कोहली ‘या’ ठिकाणाहून मतदान करणार

मुंबई : वृत्तसंस्था – देशात सर्वत्र लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची लगबग असताना भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली मतदानाला मुकणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. विराट कोहली याला मुंबईमध्ये मतदान करण्याची इच्छा होती. मात्र, आता कोहली मुंबईतून नाही तर १२ मेला गुरुग्राम येथे मतदानाचा हक्क बजावणार आहे.

सोमवारी (दि.२९) महाराष्ट्रातील चौथ्या आणि अंतीम टप्प्यातील मतदान होत आहे. यामध्ये मुंबईतील लोकसभा मतदार संघांचा समावेश आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली याला मुंबईतून मतदान करण्याची इच्छा होती. मात्र, त्याने वेळेत अर्ज न केल्याने त्याला मुंबईतून हक्क बजावता येणार नाही. मात्र, त्याचे मतदान गुरुग्राम येथे असल्याने तो १२ मे रोजी गुरूग्राम येथे आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे.

विराट कोहली यंदाच्या लोकसभेच्या मतदानाला मुकणार असे वृत्त प्रसिद्ध झाले होते. यानंतर विराटने आपल्या इस्टाग्रामवरून याबाबत स्पष्ट केले आहे. त्याने इंस्टाग्रामवर आपले मतदान ओळपत्र पोस्ट केले आहे. तसेच आपण १२ तारखेला गुरुग्रम येथून मतदान करणार आहोत, असे सांगितले आहे. तसेच त्याने आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. तुम्ही (नागरिक) सगळे मतदानाला तयार आहेत का ? असा प्रश्न त्याने आपल्या पोस्टमधून केला आहे.