ICC World Cup 2019 : वर्ल्डकपमधील पराभवानंतर ‘टीम इंडिया’मध्ये उभी फूट ! टीम २ गटात विभागली ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाचा प्रवास सेमीफायनलमधये संपल्यानंतर आता भारतीय संघाविषयी अनेक भुवया उंचावणाऱ्या गोष्टी समोर येत आहेत. संपूर्ण स्पर्धेत शानदार कामगिरी करणाऱ्या संघाला सेमीफायनलमध्ये मात्र न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला. साखळी सामन्यांमध्ये भारताने फक्त १ सामना गमावताना ८ पैकी ७ सामन्यांत विजय मिळवला होता. सेमीफायनलमधील काही खेळाडूंच्या खराब कामगिरीमुळे भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला.

Related image

मात्र आता पराभवानंतर भारतीय संघामध्ये फूट पडल्याची चर्चा समोर येत आहे. माध्यमांतून समोर आलेल्या माहितीनुसार भारतीय संघ सध्या दोन गटांत विभागला गेला आहे. भारतीय संघात फक्त कर्णधार कोहली नि रवी शास्त्री यांचाच हुकूम चालतो. त्यामुळे या दोघांच्या आवडत्या खेळाडूंनाच फक्त संघात खेळण्याची संधी मिळते. पहिला गट हा कर्णधार विराट कोहलीचा असून दुसरा गट हा उप-कर्णधार रोहित शर्माचा गट आहे. कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री हे कधीकधी एकमेकांशी चर्चा न करता थेट निर्णय घेतात, यामुळे संघात गोंधळाची परिस्थिती निर्माण होते.

Related image

रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमरा यांना त्यांच्या उत्तम कामगिरीमुळे संघाबाहेर करता येत नाही, मात्र विराट कोहलीच्या इतर आवडत्या खेळाडूंनाच संघात स्थान दिले जाते. भारतीय संघातील एका खेळाडूने दिलेल्या माहितीनुसार, केएल राहुल याने कितीही खराब प्रदर्शन केले तरी त्याला संघाबाहेर केले जाणार नाही. जोपर्यंत तो चांगली कामगिरी करत नाही तोपर्यंत त्याला संघात स्थान दिले जाणार, तो अंतिम ११ मध्ये नसला तरी त्याला १५ खेळाडूंमध्ये स्थान दिले जाणारच. आयपीएलमध्ये एकाच संघात खेळत असल्यामुळे युजवेंद्र चहल सध्या भारतीय संघात असल्याचा आरोप खेळाडूने केला आहे. त्यामुळे नेहमी कुलदीप यादव यालाच संघाबाहेर बसवले जाणार.

Image result for rayudu retires

अंबाती रायडूवरून वाद

अंबाती रायडू याचा संघात समावेश का नाही केला यावरून देखील आता वाद होत आहे. अंबाती रायुडूला भारतीय संघात जागा न मिळण्यामागेही संघ व्यवस्थापनाचा हात असल्याचे या खेळाडूने म्हटले आहे. रायडूला संघाबाहेर केले जाणार होतेच फक्त त्याच्या खराब कामगिरीची सर्व जण वाट पाहत होते, असा गौप्यस्फोट देखील त्याने केला आहे. भारतीय संघातील काही खेळाडू हे प्रशिक्षक रवी शास्त्री आणि विराट कोहली यांच्या कार्यशैलीवर देखील नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता बीसीसीआय यावर काय निर्णय घेते हे पाहणे महत्वाचे आहे.

‘पौष्टिक’ रताळे आरोग्यासाठी वरदान, होतात ‘हे’ ५ फायदे

‘मुतखडा’ या भयंकर आजारासाठी ‘तुळस’ वरदानच, जाणून घ्या

‘फिश पेडिक्यूर’चे फायदे आणि नुकसान, जाणून घ्या

‘शरीराच्या शुध्दीसाठी आणि मनाच्या सात्विकतेसाठी’ उपवास गरजेचा

‘या’ तेलांनी मसाज करा ; केसातील कोंडा आणि इतर समस्यांपासून मुक्ती मिळवा !

असे होते ‘एचआयव्ही’ या गंभीर आजाराचे संक्रमण, ही आहेत ‘लक्षणे’