टीम इंडियाच्या जीवाला वेस्ट इंडिजमध्ये ‘धोका’, PAKमधील जिओ टीव्ही ‘वृत्त’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – विंडीजमध्ये कसोटी सामने खेळणाऱ्या भारतीय संघाला जीवे मारण्याची धमकी मिळाली असून त्यांच्या जीवाला धोका असल्याचे वृत्त पाकिस्तानमधील जिओ टीव्हीने दिल्याने खळबळ उडाली आहे. भारतीय संघ सध्या विंडीजच्या दौऱ्यावर असून याठिकाणी टी-२० आणि एकदिवसीय मालिकेनंतर आता भारतीय संघ २ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.

या वृत्तानंतर भारतीय संघाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून पाकिस्तान क्रिकेट मंडळाला मिळालेला मेल आयसीसी मार्फत बीसीसीआयला सांगण्यात आला आहे. त्यानंतर भारतीय क्रिकेट मंडळाने याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाला दिली आहे. यासंदर्भात संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन विंडीज क्रिकेट मंडळाने दिले असून भारतीय संघाबरोबर या सामन्यांच्या दरम्यान एक सुरक्षा वाहन देण्यात येणार आहे. याविषयी भारतीय संघ व्यवस्थापन सुनी सुब्रमण्यम यांनी भारतीय खेळाडूंना सूचना केल्या असून सर्वांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान, भारतीय संघ पहिला कसोटी सामना २२ ऑगस्टपासून खेळणार असून दुसरा कसोटी सामना ३० ऑगस्टपासून खेळवला जाणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त-

 

You might also like