IND vs ENG : कोहलीवर भडकले फॅन्स, म्हणाले – ‘रहाणेला बनवा कॅप्टन, नाही तर होईल क्लीन स्वीप’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  चेन्नईमध्ये इंग्लंडच्या विरूद्ध पराभवानंतर भारतीय कर्णधार विराट कोहली क्रिकेट फॅन्सच्या निशाण्यावर आहे. ट्विटरवर यूजर्सनी कोहलीच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले आहेत आणि अजिंक्य रहाणेला कर्णधार बनवण्याची मागणी केली आहे.

भारतीय टीमला कोहलीच्या नेतृत्वाखाली लागोपाठ 4 टेस्ट मॅचमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. यापूर्वी मागील वर्षी फेब्रुवारीमध्ये भारताचा न्यूझीलंड दौर्‍यावर वेलिंग्टन आणि क्राइस्टचर्च टेस्टमध्ये सुद्धा पराभव झाला होता. भारताने विराट कोहलीच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियामध्ये खेळवण्यात आलेली अ‍ॅडलेड टेस्ट मॅच सुद्धा गमावली होती.

कोहली अ‍ॅडलेडच्या नंतर पितृत्व रजेवर भारतात परतला होता आणि अजिंक्य रहाणेने कर्णधार पद सांभाळले होते. रहाणेच्या नेतृत्वात भारतीय टीमने बाकीच्या तीन टेस्ट मॅचपैकी दोनमध्ये विजय नोंदवला होता आणि सीरीजवर कब्जा मिळवला होता.

ऑस्ट्रेलियामध्ये सीरीज जिंकल्यानंतर रहाणेला टेस्ट मॅचचा कर्णधार करण्याची मागणी केला जाऊ लागली होती. तिकडे, इंग्लंडच्या विरूद्ध चेन्नई टेस्टमध्ये पराभवानंतर हा पुन्हा चर्चेचा मुद्दा झाला आहे. क्रिकेट फॅन्सने ट्विटरवर आपली मत मांडत अजिंक्य रहाणेला टेस्टचा कर्णधार करण्याची मागणी केली आहे.

एका यूजरने लिहिले आहे की, विराट कोहली इतका प्रभावशाली खेळाडू आहे की, त्याच्याशिवाय ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय टीमने तीन टेस्ट खेळल्या आणि जिंकण्यात यशस्वी झाली, परंतु जसा तो टीममध्ये परत आला पुन्हा टीमला पराभवाच्या मार्गावर आणले. काय प्रभावशाली खेळाडू आहे.

तर, एका यूजरने लिहिले की, अजिंक्य रहाणे नेट गोलंदाज आणि टी-20 फलंदाजांसोबत ऑस्ट्रेलियाला पराभूत करू शकतो. विराट कोहली टॉप फलंदाज आणि गोलंदाजांसोबत इंग्लंडला भारतात पराभूत करू शकत नाही.

एका यूजरने लिहिले की, कोहलीची टीम रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु आयपीएलमध्ये नेहमी खालच्या स्थानावर राहाते. तर, एका यूजरने लिहिले की, रहाणेला भारतीय टीमचा कर्णधार बनवा, नाही तर इंग्लंडविरूद्ध क्लीन स्वीप होईल.