भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी घेतला कोरोना लसीचा पहिला डोस, शेअर केले फोटो

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : देशभरात कोरोना लसीकरणाचे काम वेगाने सुरु झाले आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सला लस दिल्यानंतर 1 मार्चपासून लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे, ज्याअंतर्गत वरिष्ठ नागरिक आणि गंभीर आजार असणाऱ्या 45 वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांना लस दिली जात आहे. या दरम्यान भारतीय संघाचे हेड कोच रवी शास्त्री यांनी कोरोना लस घेतली आहे. अहमदाबादच्या अपोलो रुग्णालयात त्यांना लसीचा पहिला डोस देण्यात आला. शास्त्री यांनी ट्विटरच्या माध्यमातून यासंबंधित माहिती दिली. यावेळी त्यांनी शास्त्रज्ञ आणि रुग्णालयातील मेडिकल टीमचे कौतुक केले.

 

 

 

 

 

 

रवी शास्त्री यांनी ट्विटरवर आपल्या पोस्टमध्ये म्हंटले कि, ‘ कोविड-19 लसीचा पहिला डोस मिळाला. साथीच्या आजाराविरुद्ध भारताला सशक्त बनविण्यासाठी डॉक्टर आणि शास्त्रज्ञाचे आभार. अपोलो हॉस्पिटलच्या कांताबेन आणि त्यांच्या टीममुळे खूप प्रभावित आहे. दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) स्रोताने याची पुष्टी केली की, भारतीय संघाच्या सपोर्ट टीमच्या अन्य सदस्यांना लसी दिली गेली नाही. भारतीय क्रिकेट संघ येथे इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळत आहे. चौथा आणि शेवटचा कसोटी सामना गुरुवारपासून अहमदाबादमध्ये खेळला जाईल. या मालिकेत भारत 2-1 ने आघाडीवर आहे.

आपल्या 58 वर्षांच्या प्रशिक्षणामध्ये रवि शास्त्री यांनी भारतीय संघाला नवीन पातळीवर आणले आहे. शास्त्री यांची 2017 मध्ये टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाली होती. त्यांच्या प्रशिक्षणाखाली भारतीय संघ सलग दोनदा ऑस्ट्रेलियाच्या भूमीवरील कसोटी मालिका जिंकण्यात यशस्वी झाला आहे. रवी शास्त्री हे 2014 ते 2016 या काळात टीम इंडियाचे संचालकही आहेत. शास्त्री यांनी भारताकडून 80 कसोटी सामन्यांत 3,830 धावा तसेच 151 बळी घेतले. कसोटी सामन्यात त्याने 11 शतके आणि 12 अर्धशतके ठोकली. तर 150 एकदिवसीय सामन्यात 3,108 धावांसह 129 बळी घेतले. शास्त्री यांनी एकदिवसीय सामन्यात 4 शतके, तसेच 18 अर्धशतके करत भारतीय क्रिकेटमध्ये महत्वाची भूमिका बजावली.