वर्ल्डकप स्पर्धा संपण्याआधीच कोच रवी शास्त्री यांना बीसीसीआयकडून ‘बक्षीस’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी वर्ल्डकप स्पर्धा सध्या इंग्लंडमधे सुरु असून भारतीय संघाने आपले सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून विजयाची सुरुवात केली असून भारतीय संघाचा आज न्यूझीलंडबरोबर सामना होणार आहे. मात्र त्या आधीच भारतीय संघाचे प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफ यांचा कार्यकाळ वाढवण्याची घोषणा बीसीसीआयच्या सीओएनी केली आहे. वर्ल्डकप स्पर्धा संपल्यानंतर ४५ दिवसांसाठी  त्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

रवी शास्त्री यांच्याबरोबरच सपोर्ट स्टाफमधील फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर, गोलंदाजी कोच भरत अरुण आणि फील्डिंग कोच आर. श्रीधर यांचा समावेश आहे. ४५ दिवसानंतर पुन्हा या पदासाठी मुलाखती घेण्यात येणार असल्याची त्यांनी माहिती दिली आहे. मुदतवाढ दिल्यानंतर या विषयी त्यांनी लिहिले आहे कि,मुदतवाढीचा कालावधी संपल्यानंतर बीसीसीआय सल्लागार समितीचा सल्ला घेऊन त्यांच्या कामगिरीविषयी ते समाधानी आहेत कि,नाही याबद्दल विचार करून पुढील निर्णय घेणार असल्याचे म्हटले.

दरम्यान, या सल्लागार समितीत सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि वीवीएस. लक्ष्मण यांचा समावेश आहे. कोणतीही नवीन योजना किंवा उपक्रम राबवण्याआधी हि समिती बीसीसीआयला सल्ला देण्याचे काम करत असते.

आरोग्यविषयक वृत्त

सावधान ! ‘या’ लोकांना ‘आइस टी’चे सेवन पडू शकते महागात

हळदीचे ‘हे’ दोन फेसपॅक वापरून तुम्ही दिसाल तजेलदार

जरा जपून, ‘या’ कारणांमुळे होऊ शकते केस गळती

*मेकअप रिमूव्ह करुन झोपा नाहीतर त्वचेला होईल नुकसान

Loading...
You might also like