टीम इंडियाच्या ‘कोच’च्या निवडीबाबत कॅप्टन विराट कोहलीचा ‘गौप्यस्फोट’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमधील भारतीय संघाच्या सेमीफायनलमधील पराभवानंतर  भारतीय संघावर क्रीडा रसिक नाराज आहेत. त्याचबरोबर भारतीय संघाचे  मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना देखील पदावरून हटवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. त्याचबरोबर भारतीय संघातील सपोर्ट स्टाफमधील काही सदस्यांनी देखील आपली जबाबदारी उत्तमपणे पार  पाडली नसल्याने त्यांच्यावर देखील नाराजी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. त्यानंतर बीसीआयने भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी अर्ज मागवले आहेत. त्याचबरोबर सपोर्ट स्टाफमधील देखील काही जणांची सुट्टी होणार असल्याने या पदांसाठी देखील अर्ज मागवले आहेत. त्यामुळे भारतीय संघाचा नवीन प्रशिक्षक कोन असणार याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

त्यानंतर आता कर्णधार विराट कोहली याने याबाबत आपले मत मांडले आहे. याविषयी बोलताना तो म्हणाला कि, माझे याबाबतीत सल्लागार समितीशी कोणतीही चर्चा झाली नसून  त्यांना मदत हवी असल्यास मी कधीही तयार आहे. त्याचबरोबर रवी शास्त्री यांच्याविषयी बोलताना तो म्हणाला कि, त्यांचे आणि माझे चांगले जुळत असल्याने याचा संघाला नक्कीच फायदा होणार आहे. त्यामुळे प्रशिक्षक कुणीही होवो. मात्र ते त्या पदावर कायम राहिल्यास मला नक्कीच आनंद होणार आहे. त्याचबरोबर विंडीज दौऱ्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना तो म्हणाला कि, रोहित शर्मा आणि माझ्यात कसलेही मतभेद नसून जर वर्ल्डकपमध्ये  आम्हा दोघांमध्ये मतभेद असते तर आमची कामगिरी चांगली झाली असती का ? त्याचबरोबर त्याने सर्व आरोप फेटाळून लावताना रोहित आणि माझ्यात सर्व काही आलबेल असल्याचे देखील म्हटले आहे. या अशा अफवा पसरवून कोणाला फायदा होणार, ते माहिती नाही, असे म्हणत त्याने या अफवा फेटाळून लावल्या.

दरम्यान, भारतीय संघ १ ऑगस्टपासून वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार असून या दौऱ्यात भारतीय संघ ३ एकदिवसीय, ३ टी-२० तसेच २ कसोटी सामने खेळणार  आहे.