ICC World Cup 2019 : टीम इंडियाच्या पराभवानंतर पाकिस्तानी फॅन्सचा ‘तीळपापड’ ; ट्विटरवर केला ‘हा’ आरोप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये सलग ५ सामन्यात विजय मिळवलेल्या विराटसेनेला इंग्लंडनं ब्रेक लावला. त्यामुळं इंग्लंडने सेमीफायनलच्या दिशेनं एक पाऊल टाकलं आहे. या सामन्यात इंग्लंडने दिलेल्या ३३८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाला ३०८ धावांपर्यंतच मजल मारता आली. मात्र या पराभवानंतर भारतीय संघाला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. मात्र या पराभवाचे जितके दुःख भारतीय पाठिराख्यांना झाले नाही त्यापेक्षा जास्त दुःख पाकिस्तानी पाठिराख्यांना झाले आहे. कारण आजच्या सामन्यात भारताने इंग्लडचा पराभव केला असता तर पाकिस्तानच्या सेमीफायनलच्या आशा पल्लवित झाल्या असत्या. मात्र पराभवाने त्या धूसर झाल्या आहेत. त्यामुळेच पाकिस्तानी फॅन्स आपला राग सोशल मीडियावर विविध माध्यमांतून काढत आहेत.

या पराभवानंतर पाकिस्तानमध्ये #Dhoni, #fixed, #indiavsEngland हे टॅग सध्या ट्रेण्डमध्ये आहेत.
इंग्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडचा पराभव केला असता तर पाकिस्तानचे सेमीफायनलमध्ये जाण्याचे स्वप्न पूर्ण झाले असते, मात्र या पराभवाने पाकिस्तानचे चाहते चांगलेच भडकले आहेत. पाकिस्तानचा आत फक्त एकच सामना बाकी असून त्यांना त्या सामन्यात विजय मिळवणे आवश्यक आहे. मात्र या पराभवाने पाकिस्तानला दुसऱ्या संघावर अवलंबून राहावे लागणार आहे. मात्र हा सामना गमावल्यानंतर पाकिस्तानी फॅन्स भारताला हा सामना फिक्स असल्याचे आरोप करू लागले आहेत.

भारतीय संघ एकीकडे पराभूत होत असताना दुसरीकडे सोशल मीडियावर पाकिस्तानी फॅन्स भारतीय संघावर आरोप करत होते. एका युझरने लिहिले आहे कि, श्रीलंका, पाकिस्तानने इंग्लंडला पराभूत केले मात्र भारतीय संघ इंग्लंडला पराभूत करू शकला नाही. त्यानंतर पाकिस्तानी फॅन्सनी ट्विटरवर आकडेवारी दाखवत हा सामना फिक्स असल्याचा आरोप केला. तर एका युझरने शेवटचे षटक हे फिक्स असल्याचा आरोप करत ५८ मीटरची बाउंड्री असून देखील सामन्यातील एकमेव षटकार हा शेवटच्या षटकात आला. त्यामुळे श्रीलंका, बांगलादेशने भारताला पराभूत करून स्पर्धेबाहेर काढावे म्हणजे खरा न्याय होईल. दरम्यान, या स्पर्धेत भारतीय संघाला दुखापतींचे ग्रहण लागले असून शिखर धवन नंतर आता विजय शंकर स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

 

पोट आणि कंबर अधिक आकर्षक करण्यासाठी करा ‘स्ट्रेचिंग’

सौंदर्य वाढविण्यासाठी खोबरेल तेल आहे गुणकारी

शरीराला पाण्याची गरज का असते ? जाणून घ्या ही ५ कारणे

‘नाईट शिफ्ट’मध्ये काम करत आहात, मग ‘हे’ पदार्थ अवश्य खा

यांनी दिलाय अनुसूचित जाती विभागाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा