महेंद्रसिंह धोनी क्रिकेटच्या मैदानावरची ‘धूम’ कायम, आत्‍ताच निवृत्‍ती न घेण्याचा ‘विचार’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – क्रिकेट वर्ल्ड कप २०१९ संपल्यानंतर आता भारतीय संघ वेस्टइंडिज दौऱ्यावर जाणार आहे. त्यासाठीची संघाची निवड १९ जुलैला होईल. परंतू महेंद्र सिंह धोनी बाबत लवकरच क्रिकेट मधून संन्यासाचा मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. असे म्हणले जात होते की वेस्टइंडिज दौऱ्या आधीच धोनी क्रिकेटमधून संन्यास घेऊ शकतो. पुढील ४८ तासात धोनी आणि सिलेक्टर्स यांच्यात धोनीच्या संन्यासाबाबात चर्चा होऊ शकते असे देखील मानण्यात येत होते. मात्र या चर्चेवर अखेर धोनीचा मॅनेजर आणि मित्र अरुण पांडेने यावर पडता टाकला आहे. अरुण पांडे यांनी सांगितले की, धोनीचा सध्या क्रिकेटमधून संन्यास घेण्याचा कोणताही विचार नाही, त्यांनी असे देखील स्पष्ट केले की माहीचा क्रिकेट सोडण्याचा कोणताही प्लॅन नाही.

याआधी मानले जात आहे की वेस्टइंडिज दौऱ्यात धोनीचे सिलेक्शन करण्यात येणार नाही. या दरम्यान सिलेक्टर्स त्यांच्याशी क्रिकेटमधील संन्यासाबाबत चर्चा करण्यात येईल. महेंद्र सिंह धोनीवर नीट खेळत नसल्याची टीका करण्यात येत आहे.

बीसीसीआयच्या सूत्रानुसार पूर्ण वर्ल्ड कपमध्ये धोनीने सावकाश फलंदाजी केल्याने मुख्य निवडकर्ते एमएसके प्रसाद लवकरच त्याच्याशी चर्चा करणार आहेत असे सांगण्यात आले. ते म्हणाले की जर धोनीने स्वत:च संन्यास घेतला नाही तरी टीममध्ये त्याला घेण्यात येणार नाही. त्यांनी यातून संकेत दिले जात होते की धोनीला संघात सामावून घेण्याचा विचार नाही.

परंतू आता धोनीच्या क्रिकेट मधून संन्यास घेण्याच्या चर्चेला पुर्ण विराम मिळाला आहे. धोनीच्या मॅनेजरने धोनी संन्यास घेण्याचा विचारात नसल्याचे सांगितल्याने त्याच्या चाहत्यांना कुठे तरी दिलासा मिळाला आहे. परंतू धोनीने स्वत: हून कोणताही निर्णय न दिल्याने अनेकांच्या मानात याबाबत संभ्रम आहे. असे असेल तरी वेस्टइंडिज दौऱ्यात त्यांना सहभागी करुन घेणार का यावर प्रश्न चिन्ह आहे.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like