शिखर धवनची ‘ही’ कला पाहून चाहतेही ‘थक्क'(व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय फलंदाज शिखर धवनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये धवन बासरी वाजवताना दिसत आहे. वेस्ट इंडिज विरोधात झालेल्या एकदिवसीय मालिकेत शिखर धवनला सूर सापडला नाही. मात्र त्याच्या बासरीच्या सुरांचे चाहत्यांकडून कौतुक होत आहे. याआधीही धवननं रस्त्यावरील मुलांना फ्लाईंग किस शिकवत असल्याचा व्हिडिओ पोस्ट केला होता.

शिखर धवन आपल्या सेलिब्रेशनसाठी चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. यावेळेस तो चर्चेत आला आहे ते बासरी वाजवण्यामूळे. धवननं आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ टाकला आहे, या व्हिडीओमध्ये धवन समुद्र किनाऱ्यावर बासरी वाजवताना दिसत आहे. या व्हिडिओला धवननं एक नवीन सुरुवात, झाडं, हवा, समुद्र आणि संगीत असे कॅप्शन दिले आहे.

वेस्ट इंडिज विरोधात झालेल्या एकदिवसीय मालिकेत खेळलेल्या शिखर धवनला चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळं धवनची कसोटी संघात निवड झाली नाही. दरम्यान धवन सध्या भारतात आराम करत आहे. भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात 15 सप्टेंबरपासून 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. धवन इंडिया ए विरुद्ध दक्षिण आफ्रिका ए यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील 2 सामने खेळणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –