शुबमन गिलची दमदार खेळी ! सुनील गावसकरांचा 50 वर्षाचा जुना विक्रम मोडीत

पोलीसनामा ऑनलाईन टीम : शुबनम गिलने एक विक्रम केला आहे. कि त्याने भारताचे एक माजी क्रिकेटपट्टू सुनील गावसकर यांचा विक्रम मोडला आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३६९ धावा केल्या आणि भारताने प्रत्युत्तरात ३३६ धावा केल्या. त्यामुळे पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने ३३ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने २९४ धावा करत भारताला विजयासाठी ३२८ धावांचे आव्हान दिले. या लक्षचा पाठलाग करताना भारताचा शुबमन गिल याने जोरदार अर्धशतकी खेळी केली.

आपला तिसराच कसोटी सामना खेळणारा शुबमन गिल याने १४६ चेंडूत त्याने ९१ धावांची खेळी केली. पण त्याने लिटल मास्टर सुनील गावसकरांचा विक्रम मोडीत काढला आहे. शुबमन गिलने अतिशय दमदार फलंदाजी केली. चौथ्या डावात रोहित शर्मा लवकर बाद झाल्यानंतर गिलने पुजाराच्या साथीने खेळ पुढे चालू ठेवला. नव्वदीत असताना त्याने नॅथन लायनच्या बाहेरच्या रेषेत असलेल्या चेंडूला बॅट लावली आणि तो झेलबाद झाला. पण ८ चौकार आणि २ षटकारांसह त्याने भारताला लय मिळवून दिली.

या खेळीसोबतच गिलने सुनील गावसकर यांचा ५० वर्ष जुना विक्रम मोडला. कसोटी क्रिकेटमध्ये चौथ्या डावात अर्धशतक ठोकणारा तो सर्वात कमी वयाचा भारतीय ठरला. गिलने २१ वर्ष आणि १३३ दिवसांचा असताना हा पराक्रम केला. गावसकरांनी १९७०-७१ मध्ये वेस्ट इंडिविरूद्ध २१ वर्षे आणि २४३ दिवसांचे असताना चौथ्या डावात अर्धशतक झळकावलं होतं. गावसकर त्या डावात ६७ धावाच करू शकले होते. अतिशय दमदार खेळी करत त्याने विक्रम केला आहे.