क्रिकेट 2020 : टीम इंडियामधील ‘हे’ दिग्गज होणार निवृत्त ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय क्रिकेट संघाने 2019 मध्ये उत्तम कामगिरी करत क्रिकेट विश्वात आपला दबदबा कायम ठेवला आहे. सध्या नवीन खेळाडू मोठ्या प्रमाणवर संघात आपले स्थान निश्चित करत आहेत. त्यामुळे पुनरागमनाच्या प्रतीक्षेत असलेल्या खेळाडूसाठी आता संघाची वाट खडतड होत चालली आहे. त्यामुळे नव्या वर्षी म्हणजेच 2020 साली अनेक खेळाडू निवृत्ती घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे खेळाडू होऊ शकतात निवृत्त

सुरेश रैना
2005 ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदारर्पण केलेला रैना टी20 मध्ये भारताकडून पहिलं शतक करणारा फलंदाज आहे. 2011 च्या वर्ल्ड कप संघातही तो होता. आगामी टी20 वर्ल्ड कपमध्ये त्याला संधी मिळण्याची शक्यता धूसर आहे. रैनाने वनडे सोबत आयपीएलमध्येही आपल्या चांगल्या कामगिरीचे प्रदर्शन केले होते मात्र सध्या रैनासुद्धा निवृत्तीच्या वाटेवर आहे. खराब फॉर्म असल्यामुळे रैना नवीन वर्षात आपली निवृत्ती जाहीर करू शकतो.

महेंद्रसिंग धोनी
माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनी विश्वकपानंतर एकही क्रिकेटचा सामना खेळलेला नाही. त्यामुळे अशात वारंवार धोनीच्या निवृत्तीविषयी चर्चा समोर आल्या होत्या. याआधी देखील धोनीने कसोटीमधून निवृत्ती घेतल्याचा निर्णय अचानकपणे जाहीर केला होता. त्यामुळे आता बऱ्याच काळापासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहिलेला धोनी पुन्हा येणार की निवृत्ती जाहीर करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

दिनेश कार्तिक
महेंद्रसिंह धोनी हा संघातील उत्तम फलंदाज आणि यष्टीरक्षक देखील होता ज्या वेळी धोनी अनुपस्थित असेल त्यावेळी यष्टीरक्षक पदाची जबाबदारी दिनेश कार्तिक कडे असे मात्र धोनीच्या काळात कार्तिकला तितकीशी संधी मिळू शकली नाही त्यात अनेक वेळा दुखापतीमुळे कार्तिकला संघा बाहेर देखील रहावे लागले. तसेच धोनी नंतर संघाला ऋषभ पंत आणि वृद्धीमान साहा सारखे पर्याय देखील यष्टीरक्षक म्हणून उपलब्ध झालेले आहेत आणि त्यामुळे आता पुढील वर्षी निवृत्ती घेण्यामध्ये दिनेश कार्तिकचा नंबर लागू शकतो.

रविचंद्रन अश्विन
2010 ला भारतीय संघात आलेल्या अश्विनने भारताच्या फिरकी गोलंदाजीची जबाबदारी समर्थपणे पेलली. विशेष म्हणजे गेल्या दशकातील तो भारताचा सर्वोत्तम गोलंदाजही राहिला आहे. 2017 मध्ये त्याने शेवटचा टी20 सामना खेळला होता.त्यानंतर मात्र भारतीय संघात तो दिसलाच नाही. त्यामुळे पुढील वर्षी अश्विन आपली निवृत्ती जाहीर करू शकतो.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/