ICC World Cup 2019 : भारतीय संघाच्या फोटोत दारूची बाटली ? जेडीयू नेता ‘फेक’ फोटोचा ‘शिकार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कालचा राहिलेला सामना खेळवण्यात येणार आहे. काल न्यूझीलंडनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारत ४६.१ षटकात ५ बाद २११ धावांची मजल मारली असताना पावसाला सुरुवात झाली आणि त्यानंतर पुन्हा सामना सुरु झाला नाही. त्यामुळे आज उर्वरित सामना खेळवण्यात येणार आहे. त्याचदरम्यान, जेडीयू नेता अजय आलोक हे फेक न्यूजचे शिकार झाले आहेत. सामना सुरु होण्याआधी त्यांनी एक फोटो ट्विट केला. या फोटोत भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या खुर्चीखाली दारूची बॉटल ठेवलेली आढळून येत आहे.

अजय आलोक यांनी आज दुपारी १२. ४६ मिनिटांनी ट्विट करत यामध्ये हा फोटो देखील लावला. त्याचबरोबर त्यांनी त्या ट्विटमध्ये लिहिले कि, चांगले झाले कि, विराट कोहली आणि रवी शास्त्री यांचा हा फोटो बिहारमध्ये नाही काढला, नाहीतर वर्ल्डकपचे सेलिब्रेशन जेलमध्ये करावे लागले असते. तुम्हाला आणि नितीश कुमार यांना देखील याचे दुःख झाले असते. त्याचबरोबर त्यांनी पुढे भारतीय संघाला या सामन्यासाठी शुभेच्छा देखील दिल्या. या फोटोमध्ये विराट कोहली आणि संपूर्ण भारतीय संघाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केल्यानंतर हा फोटो काढला होता. खरेतर हा फोटो फोटोशॉप केला असून या खुर्चीखाली दारूची बाटली ठेवण्यात आली आहे.

दरम्यान, भारतीय संघाचा हा फोटो असून बीसीसीआयने ६ जुलै रोजी हा फोटो ट्विट केला होता. बीसीसीआयने हा फोटो ट्विट करताना त्यामध्ये लिहिले होते कि,एक टीम, एक देश, एक इमोशन. त्यामुळे जेडीयू नेता अजय आलोक हे सोशल मीडियावरील खोट्या फोटोला फसले आहेत.

आळूची ‘पाने’ आहेत अनेक आजारांवर गुणकारी

फेस सिरमबद्दल तुम्हाला ‘या’ गोष्टी माहित आहेत का ?

तुम्ही विसरभोळे आहात ? मग करा ‘हे’ उपाय

सकाळचा ‘नाष्टा’ न केल्यामुळे वाढतो ‘मायग्रेन’चा धोका

नोकरदार महिलांनी ‘या’ मेकपच्या वस्तू कायम जवळ ठेवाव्यात

रोज सकाळी ‘या’ टिप्स फॉलो करा आणि ताण-तणाव दूर ठेवा

तोतया सीबीआय अधिकारी पोलीसांच्या जाळ्यात

You might also like