Team India Schedule | बीसीसीआयकडून श्रीलंका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या होम सीरिजचे वेळापत्रक जाहीर

पोलीसनामा ऑनलाइन : बीसीसीआयने श्रीलंका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन घरच्या मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. भारतीय संघ जानेवारीत श्रीलंकेविरुद्ध 3 सामन्यांची टी-20 आणि वनडे मालिका खेळणार आहे. यानंतर भारत जानेवारी-फेब्रुवारीमध्ये न्यूझीलंडविरुद्ध 3 सामन्यांची वनडे आणि टी-20 मालिका खेळणार आहे. यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ फेब्रुवारी-मार्चमध्ये भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया 4 सामन्यांची कसोटी मालिका व 3 सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे.

 

पुढील वर्षी भारतात होणार्‍या विश्वचषकाच्या दृष्टीने या तीन मालिका अतिशय महत्त्वाच्या आहेत. सध्या सुरू असलेला बांगलादेशविरुद्ध वनडे आणि कसोटी दौरा पूर्ण केल्यानंतर भारतीय संघ पुढील तीन महिने आपल्या होम ग्राउंडवर खेळणार आहे. याला श्रीलंका दौऱ्यापासून सुरुवात होणार आहे. चला तर जाणून घेऊया भारताचे होम सीरिजचे वेळापत्रक….

1.भारत आणि श्रीलंका टी-20 आणि वनडे मालिकेचे वेळापत्रक
पहिला टी-20 सामना – 3 जानेवारी – मुंबई
दुसरा टी-20 सामना – 5 जानेवारी – पुणे
तिसरा टी-20 सामना – 7 जानेवारी – राजकोट
पहिला वनडे सामना – 10 जानेवारी – गुवाहाटी
दुसरा वनडे सामना – 12 जानेवारी – कोलकाता
तिसरा वनडे सामना – 15 जानेवारी – त्रिवेंद्रम

2.भारत आणि न्यूझीलंड संघातील टी-20 आणि वनडे मालिकेचे वेळापत्रक –
पहिला वनडे सामना – 18 जानेवारी – हैदराबाद
दुसरा वनडे सामना – 21 जानेवारी – रायपूर
तिसरा वनडे सामना – 24 जानेवारी – इंदौर
पहिला टी-20 सामना – 27 जानेवारी – रांची
दुसरा टी-20 सामना – 29 जानेवारी – लखनौ
तिसरा टी-20 सामना – 1 फेब्रुवारी – अहमदाबाद

3.भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांतील कसोटी वनडे मालिका –
पहिला कसोटी सामना – 9 ते 13 फेब्रुवारी – नागपूर
दुसरा कसोटी सामना – 17 ते 21 फेब्रुवारी – दिल्ली
तिसरा कसोटी सामना – 1 ते 5 मार्च – धर्मशाळा
चौथा कसोटी सामना – 9 ते 13 मार्च – अहमदाबाद
पहिला वनडे सामना – 17 मार्च – मुंबई
दुसरा वनडे सामना – 19 मार्च – विशाखापट्टनम
तिसरा वनडे सामना – 22 मार्च – चेन्नई

Web Title :- Team India Schedule | bcci has announced the schedule of indias home series against sri lanka new zealand and australia

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sharad Pawar | ‘देशातील सर्व शक्ती एकवटल्याने गुजरातमध्ये BJP आल्याचे नवल नाही; दिल्ली, हिमाचलमध्ये भाजप हरला’ – शरद पवार

Pune Crime | एसबीआय बँकेत नोकरीच्या बहाण्याने तरुणाची 5 लाखांची फसवणूक; ताडीवाला रोड परिसरातील घटना