Team India South Africa Tour | द. आफ्रिकेच्या दौऱ्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का ! रोहित शर्मा दुखापतीमुळे संघातून बाहेर; प्रियांक पांचालला संधी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भारतीय क्रिकेट संघाच्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याला (Team India South Africa Tour) 26 डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. या दौऱ्यासाठी भारतीय खेळाडू 16 डिसेंबर रोजी मुंबईतून दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार आहेत. आफ्रिका दौरा (Team India South Africa Tour) सुरु होण्याच्या आधीच भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. भारतीय कसोटी संघाचा (Test team) उपकर्णधार (Vice-captain) आणि मर्यादित षटकाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याला सराव करताना गंभीर दुखापत (Serious injury) झाली आहे. मात्र आता दुखापतीमुळे रोहित कसोटी संघाबाहेर झाल्याची मोठी माहिती समोर येत आहे. रोहितच्या जागी युवा खेळाडू प्रियांक पांचाल (Priyank Panchal) याला संधी देण्यात आल्याची माहिती बीसीसीआयने (BCCI) ट्विट करुन दिली आहे.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघ
विराट कोहली Virat Kohli (कर्णधार), केएल राहुल (KL Rahul), मयांक अगरवाल (Mayank Agarwal), चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara), अजिंक्य रहाणे (ajinkya rahane), श्रेयस अय्यर (Shreyas Iyer), प्रियांक पांचाल, हनुमा विहारी (Hanuma Vihari), ऋषभ पंत Rishabh Pant (विकेटकीपर), रिद्धिमान साहा Riddhiman Saha (विकेटकीपर), आर आश्विन (R Ashwin), जयंत यादव (Jayant Yadav), इशांत शर्मा (Ishant Sharma), मोहम्मद शमी (Mohammad Shami), उमेश यादव (Umesh Yadav), जसप्रीत बुमराह (Jaspreet Bumrah), शार्दुल ठाकूर (Shardul Thakur), मोहम्मद सिराज (Mohammad Siraj)

स्टँड बाय प्लेअर – नवदीप सैनी, सौरभ कुमार, दीपक चहर, अर्जान नागव्सल्ला

कसा असेल दौरा
भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यामध्ये (Team India South Africa Tour) 3 कसोटी आणि 3 एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. भारत तब्बल तीन वर्षानंतर दक्षिण आफ्रिकेचा दौर करणार आहे. यापूर्वी, भारतानं 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता. (Team India South Africa Tour)

कसोटी समान्यांचे वेळापत्रक
पहिला कसोटी सामना – 26 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2021 सुपरस्पोर्ट पार्क, सेन्चुरियन.

दुसरा कसोटी सामना – 3 जानेवारी 2022 ते 7 जानेवारी 2022 न्यू वांडरर्स मैदान, जोहान्सबर्ग.

तिसरा कसोटी सामना – 11 जानेवारी 2022 ते 15 जानेवारी 2022 न्यू लँड्स, केपटाऊन

एकदिवसीय सामन्यांचे वेळापत्रक
पहिला एकदिवसीय सामना – 19 जानेवारी 2022 बोलंड पार्क, पार्ल

दुसरा एकदिवसीय सामना – 21 जानेवारी 2022 बोलंड पार्क, पार्ल

तिसरा एकदिवसीय सामना – 23 जानेवारी 2022 न्यू लँड्स, केपटाऊन

 

Web Title :- Team India South Africa Tour | rohit sharma ruled out in indias test squad for south africa tour priyank panchal replaces him

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

का खर्च करायचे 12 लाख, जर येथे 3.8 लाखात मिळत आहे Mahindra Scorpio, जाणून घ्या सविस्तर ऑफर

Pune Crime | पुण्यात तृतीयपंथी ‘आशु उर्फ आनिश’ खून, 4 तासात ‘धर्मु ठाकुर’ आणि युगल ठाकुर गजाआड

Pune Crime | पुण्यातील MIT College च्या फ्रेशर्स पार्टीत ‘राडा’, सीनिअर कडून ज्युनिअर्संना मारहाण