द.आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर ; धोनीसह हे २ खेळाडू संघाबाहेर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) गुरुवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली. विशेष म्हणजे भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंग धोनीला संघात स्थान देण्यात आले नाही. त्याचबरोबर वेगवान गोलंदाज भुवनेश्‍वर कुमार आणि जसप्रीत बुमराह यांचादेखील अंतिम संघात समावेश नाही. त्याचवेळी वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेत संघात नसणारा ऑलराऊंडर खेळाडू हार्दिक पांड्याला मात्र संघात स्थान मिळाले आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धची तीन सामन्यांची टी २० मालिका संपल्यानंतर तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाईल. दोन संघांमधील पहिला कसोटी सामना २ ऑक्टोबरपासून सुरू होईल.

टी २० मालिकेसाठी निवड झालेला संघ :
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), के.एल. राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, क्रुणाल पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, खलील अहमद, दीपक चहर, नवदीप सैनी.

ही मालिका १५ सप्टेंबरपासून सुरू होईल :
पहिला सामना १५ सप्टेंबर रोजी धर्मशाला येथे खेळला जाईल. दुसरा सामना १८ सप्टेंबर रोजी मोहाली येथे आणि तिसरा टी २० सामना २२ सप्टेंबरला बेंगळुरू येथे होईल. यानंतर दोन्ही संघांमध्ये तीन कसोटी सामन्यांची मालिका होईल. ही मालिका ऑक्टोबर अखेरपर्यंत चालणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –