ICC World Cup 2019 : भारतीय संघ पुन्हा एकदा दिसणार भगव्या रंगाच्या ‘जर्सी’त ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत आता रंगत आली असून भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या तीन संघानी सेमीफायनलमध्ये प्रवेश केला असून न्यूझीलंड यातील चौथा संघ असून आज बांगलादेश आणि पाकिस्तानच्या सामन्यानंतर हे नक्की होईल. त्यामुळे सेमीफायनलमध्ये कोण कुणाशी भिडणार याची चर्चा क्रीडा प्रेमींमध्ये रंगू लागली असून भारताचा सामना कुणाशी होणार. यावर भारतीय चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरु आहे.

या स्पर्धेत इंग्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यात भारतीय संघ भगव्या आणि निळ्या रंगाच्या जर्सीमध्ये दिसून आला होता. त्यानंतर आता पुन्हा भारतीय संघ या जर्सीमध्ये खेळणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगू लागल्या आहेत. भारतच नाही तर बांगलादेश, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान या संघानी देखील दुसऱ्या रंगाच्या जर्सी घेतल्या होत्या.

भारतीय संघ सेमीफायनलमध्ये पोहोचला असून सेमीफायनलमध्ये जर भारतीय संघाचा सामना इंग्लंडबरोबर झाला तर भारतीय संघ पुन्हा एकदा भगव्या रंगाच्या जर्सीमध्ये खेळताना दिसून येईल. आयसीसीच्या नवीन नियमांनुसार आयसीसीच्या स्पर्धेत दोन्ही संघाची जर्सी एका रंगाची असेल. तर पाहुण्या संघाला वेगळ्या रंगाची जर्सी परिधान करावी लागते. मात्र त्यासाठी सेमीफायनलमध्ये भारतीय संघाचा सामना इंग्लंडबरोबर होणे गरजेचे आहे.

तर होऊ शकतो भारत-इंग्लंड सामना

सध्या गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया पाहिल्या क्रमांकावर असून भारत दुसऱ्या तर इंग्लंड तिसऱ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंड हा सेमीफायनलमधील चौथा संघ ठरणार आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या शेवटच्या साखळी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला पराभूत केले आणि भारतीय संघाने श्रीलंकेला पराभूत केलं तर भारतीय संघ गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर जाईल. अशा परिस्थिती भारतीय संघाचा सामना चौथ्या क्रमांकावरील न्यूझीलंडबरोबर होईल. मात्र उद्या ऑस्ट्रेलिया जिंकल्यास दुसऱ्या क्रमांकावरील वरील भारत आणि तिसऱ्या क्रमांकावरील इंग्लंड यांच्यात सेमीफायनलमधील सामना होईल आणि भारतीय पुन्हा एकदा भगव्या रंगाची जर्सी परिधान करण्याची संधी मिळेल.

पावसाळ्यात केसांची विशेष काळजी घ्या, कारण …

पावसाळ्यात मक्याचं कणीस खाण्याचे अनेक फायदे

पावसाळ्यात येणारी ‘ही’ भाजी आहे सर्वात पौष्टिक ; खा आणि रोगमुक्त व्हा

पावसाळ्यात माशांमुळे पसरू शकते रोगराई, असा टाळा उपद्रव

‘या’ कारणामुळे पावसाळ्यात ‘डोळ्यांच्या समस्या’ निर्माण होतात

य़ेरवडा कारागृहात टोळीयुद्ध जोमात, नक्की चाललंय तरी काय ?

महाआघाडीच्या अडचणीत वाढ,वंचितनंतर ‘हा’ पक्षही देणार धक्का ?