‘या’ तारखेला होणार टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाची घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमधील भारतीय संघाच्या सेमीफायनलमधील पराभवानंतर भारतीय संघावर मोठ्या क्रीडा रसिक नाराज आहेत. त्याचबरोबर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना देखील पदावरून हटवण्यात येणार आहे. त्याचबरोबर भारतीय संघातील सपोर्ट स्टाफमधील काही सदस्यांनी देखील आपली जबाबदारी उत्तमपणे पार पाडली नसल्याने त्यांच्यावर देखील नाराजी मोठया प्रमाणात पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता या पदांसाठीअर्ज मागवले असून यामध्ये आतापर्यंत पाच जण या शर्यतीत आघाडीवर असून कपिल देव यांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती भारतीय संघाच्या प्रशिक्षकाची निवड करणार आहे.कपिल देव यांच्या समितीच्या वतीनं शुक्रवारी १६ ऑगस्ट रोजी प्रशिक्षकपदासाठी मुलाखती घेतल्या जाणार आहेत.

मात्र आता यासंदर्भातील महत्वाची माहिती समोर येत असून १६ ऑगस्ट रोजी या पदांसाठी मुलाखती होणार असून याच दिवशी प्रशिक्षकाची निवड करण्यात येणार आहे. कपिल देव यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय समिती प्रशिक्षकाचा अंतिम निर्णय घेणार असून कुणाची निवड केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. भारतीय संघाच्या या प्रशिक्षकपदासाठी रवी शास्त्री यांच्यासह टॉम मूडी, माइक हेसन, लालचंद राजपूत, फील सिमन्स या दिग्गजांनी अर्ज केले असून लवकरच यावर निर्णय होईल.

त्याचबार्बर भारताचे माजी फलंदाज प्रवीण आमरे यांनी फलंदाजी प्रशिक्षकासाठी तर जाँटी ऱ्होड्सने फिल्डिंग कोचसाठी अर्ज केला आहे. वेस्ट इंडिजचा माजी अष्टपैलू खेळाडू आणि अफगाणिस्तानचा प्रशिक्षक  फिल सिमन्स यानंही प्रशिक्षक पदासाठी अर्ज केला आहे.त्याच्याकडे प्रशिक्षकपदाचा दीर्घ अनुभव असून त्याने आतापर्यंत आयर्लंड, वेस्ट इंडिज आणि झिम्बॉम्बे  या संघांचे प्रशिक्षकपद भूषविले आहे.

दरम्यान, कर्णधार विराट कोहली याला संघाच्या प्रशिक्षकपदी रवी शास्त्री हेच हवे असल्याने आता नक्की काय निर्णय होणार  याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर रवी शास्त्री यांची पुन्हा यापदी निवड झाली तर मला नक्कीच आनंद होईल असे विराट कोहली याने म्हटले होते. त्याचबरोबर मला त्यांच्याबरोबर काम करायला आवडते असेही विराट कोहली म्हणाला होता.

आरोग्यविषयक वृत्त

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like