माझ्या मुलाने कामं नाही केले तर त्याचे कपडे फाडा

मुख्यमंत्र्यांचे मुलासाठी मत मागताना 'अजब' विधान

छिंदवाडा : वृत्तसंस्था – देशामध्ये लोकसभा निवडणुकीची धामधुम सुरू आहे. निवडणुकीत नेते काय बोलतील याचा नेम नाही. काही जण बोलण्याच्या ओघात वादग्रस्त विधान करून अडचणीत आले आहेत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री यांनी आपल्या मुलासाठी मत मागताना अजब विधान केले आहे. जर माझ्या मुलाने काम नाही केले तर त्याचे कपडे फाडा असे कमलनाथ म्हणाले. छिंदवाडामधील एका सभेत ते बोलत होते.

कमलनाथ यांचे सुपुत्र नकुल हे छिंदवाडामधून उभे आहेत. कमलनाथ यांनी सलग नऊवेळा या मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. यंदा त्यांनी आपल्या मुलाला या मतदारसंघातून उभे केले आहे. कमलनाथ म्हणाले, मी आज जे काही आहे ते तुमच्यामुळे आहे, कारण तुम्ही मला प्रेम दिले आणि ताकद दिली. नकुल आज इथे नाही. परंतु तो आपली सेवा नक्की करेल. मी त्याच्याकडे ही जबाबदारी देत आहे. जर त्याने तुमची कामे नाही केली तर त्याला शिक्षा द्या. त्याचे कपडे फाडा.

या सभेत त्यांनी केंद्र सरकार आणि माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच लोकांना भुलवण्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.