‘रडत-रडत’ निवृत्त झाली सेरेना विल्यम्स्, फक्त १९ मिनीट चालली ‘अंतिम’ मॅच

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – यूएस ओपनच्या तयारीसाठी सध्या टोरोंटो येथे रॉजर्स कप चे सामने सुरु होते. तेथे टेनिस बेस्ट प्लेअर सेरेना विल्यम्सच्या पदरी निराशा पडली आहे. रॉजर्स कपच्या अंतिम सामन्यात सेरेना कॅनडाच्या बियान्का अँड्रेस्कू हिच्या विरुद्ध खेळत होती. मात्र तिच्या पाठदुखीच्या समस्येमुळे तीला पहिल्या फेरीतच माघार घ्यावी लागली आहे. यावेळी सेरेनाच्या डोळ्यात वेदनांचे अश्रू स्पष्ट दिसत होते.

सेरेना विल्यम्स आणि कॅनडाच्या बियान्का अँड्रेस्कू यांच्या रॉजर्स कपचा अंतिम सामना सुरु होता. तेव्हा बियान्का आणि सेरेना यांच्या गुणफलक ३-१ असा होता. बियान्का सेरेनापेक्षा दोन गुणांनी आघाडीवर होती. तेव्हा सेरेनाही चांगल्या खेळाचे प्रदर्शन करताना दिसली. मात्र त्यानंतर सेरेना अचानक रडू लागली. आणि तिने सामन्याच्या मधूनच निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला.

झालेल्या सामन्यानंतर सेरेनाने यावर स्पष्टीकरणही दिले. मला क्षमा करा की, मला काहीही करता आले नाही. मी खूप प्रयत्न केले पण मी माझा खेळ सुरु ठेवू शकले नाही. हे सांगताना तिच्या डोळ्यांत अश्रू होते. तसंच हे वर्ष खूप कठीण होते. परंतु मी प्रयत्न करत राहणार आहे, असंही तिने यावेळी सांगितलं.

सेरेना ही ३७ वर्षांची असून यापूर्वी ती आपल्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे खेळापासून दूर राहिली होती. त्यातून बाहेर आल्यानंतर या स्पर्धेसाठी स्वत: ला फिट घोषित केले. मात्र अंतिम सामन्यात तिने माघार घेतली.

दरम्यान, सेरेनाने माघार घेतल्यामुळे रॉर्जर कप विजेती म्हणून बियान्काला घोषित करण्यात आले. त्यामुळे कॅनडामधून रॉर्जर कप जिंकणारी बियान्का अँड्रेस्कु ही पहिली महिला ठरली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –