‘बिग बी’ अमिताभच्या ‘मराठमोळ्या’ चित्रपटाचा टिझर ‘लॉन्च’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बीग बी अमिताभ बच्चन लवकरच एका मराठमोळ्या चित्रपटात दिसणार आहेत. प्रेक्षकांची या चित्रपटाबाबतची उत्सुकता आता वाढली आहे. कारण चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले असून चित्रपटाचे नाव एबी आणि सीडी आहे. या चित्रपटातून अमिताब बच्चन मराठीमध्ये पदार्पण करत आहेत.

एबी आणि सीडी या मराठी चित्रपटाचा ऑफिशल टीझर प्रदर्शित झाला असून यात मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते विक्रम गोखल हे सुद्धा अमिताभ बच्चन यांच्यासोबत पडद्यावर दिसणार आहेत.

वृद्धत्वानंतर येणारे अनुभव यात मांडण्यात आले आहेत. याशिवाय विक्रम गोखले यांना आवाज देणारा अमिताभ यांचा भारदस्त आवाज प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.

अमिताभ हे विक्रम गोखले यांचे विद्यार्थी असून या दोघांची अनेक वर्षांनंतर भेट होणार आहे, असे टीझरवरून दिसून येते. परंतु, या भेटीत काय-काय घडणार, किंवा भेट होणार किंवा नाही, हे प्रेक्षकांना 13 मार्चला चित्रपट पाहिल्यानंतरच समजणार आहे.