5G स्पेक्ट्रम ! सर्व कंपन्यांना मिळणार ‘ट्रायल’ची ‘संधी’, केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सोमवारी सांगितले की सरकार दूरसंचार क्षेत्रातील सर्व कंपन्यांना 5G स्पेक्ट्रमचे वितरण करणार आहे. रवी शंकर प्रसाद म्हणाले, ‘आम्ही 5G चाचणीचा निर्णय घेतला असून 5G हेच भविष्य आहे. या तंत्राच्या मदतीने आम्ही नवीन उपक्रमांची सुरुवात करू. सर्व टेलिकॉम ऑपरेटर 5G चाचण्यांमध्ये भाग घेऊ शकणार आहेत.’

विक्रेता कंपन्यांच्या बरोबर चाचणी घेणार आहेत. तसेच या चाचणीचा अर्थ असा नाही की सरकारने कॉमर्शियली 5G सुरू केले आहे. दूरसंचार विभाग या चाचणीसंदर्भात सर्व टेलीकॉम सर्विस प्रोवाइडर्स सोबत करार करेल. यानंतर या कंपन्या त्यांचा विक्रेता पार्टनर निवडतील. यामध्ये नोकिया, हुआवेई, एरिक्सन आणि सॅमसंग यांचा समावेश आहे. मंगळवारी दूरसंचार विभाग सर्व विक्रेत्यांसमवेत एक बैठक देखील घेणार आहे.

या महिन्याच्या सुरूवातीस, दूरसंचार विभागाने पुढील स्पेक्ट्रमच्या लिलाव किंमतींना मान्यता दिली होती. यात 6,030 मेगाहर्ट्झच्या एअरवेव्हचा समावेश आहे, जो 5G तंत्रज्ञानासाठी वापरला जाईल.

हुआवेईसाठी दिलासा मिळाल्याची बातमी

सरकारकडून करण्यात आलेली ही घोषणा हुआवेई टेक्नॉलॉजी लिमिटेडसाठी मोठी दिलासा देणारी आहे. कारण नुकतीच जागतिक स्तरावर मोठी समस्या निर्माण झाली होती. अमेरिकेसह अनेक देशांनी हुआवेईवर आरोप केले आहेत की ही कंपनी आपला डेटा चीनी सरकारबरोबर सामायिक करीत आहे. हुआवेईने पूर्वीही असा दावा केला होता की भारतात जर बंदी घातली गेली तर देशात 5G सेवा सुरू होण्यास आणखी 2 ते 3 वर्षे लागू शकतात.

हुआवेईने 50 कॉमर्शियल करार केले आहेत

हुआवेई (Huawei) आधीच 50 व्यावसायिक 5G करार मिळविण्यात यशस्वी झाले आहे. यापैकी 28 युरोप, 11 मध्य पूर्व, 6 आशिया-पॅसिफिक, 4 उत्तर अमेरिका आणि 1 आफ्रिका येथे आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/