Android आणि iOS च्या 167 बोगस Apps पासून राहा सावध; नाहीतर बसेल मोठा फटका, Cyber Researchers नं ओळखलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  सध्या स्मार्टफोनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे विविध Apps आणले जात आहेत. त्यामध्ये हॅकर्सकडून बोगस Apps ही आणले जात आहेत. याच Apps च्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकार घडत आहेत. पण आता सायबर रिसर्चरने याबाबत माहिती दिली आहे.

अशी होते फसवणूक…

सर्वसाधारणपणे हॅकर्स लोकांना डेटिंग साईट्सच्या माध्यमातून फसवतात किंवा जास्त पैशांचे आमिष दाखवून बोगस Apps डाऊनलोड करण्याचे सांगितले जाते. अशाप्रकारे फसवणूक करणाऱ्या साईट्स बनावट असल्याचे दिसत नाही. कारण त्याची मांडणी त्याप्रकारे केली जाते. काही Apps मध्ये तर Customer Support ही दिला जातो. त्याच्याशी Chat करण्याचा पर्याय दिला जातो. अशाप्रकारे रिअल Apps सारखेच याची ऑपरेशन पद्धत असते. त्यानुसारच आता 167 बोगस Apps ओळखण्यात आले आहेत.

फसवणुकीची पद्धत काय?

सोफोसमध्ये सीनिअर थ्रेट रिसर्चर जगदीश चंद्रा यांनी सांगितले, की बोगस Apps जगभरातील खऱ्या Apps नुसार काम करण्याचे नाटक करतात. खाजगी स्तरावर युजरची माहिती घेतात. त्यानंतर सातत्याने बोगस App मध्ये रक्कम टाकणे किंवा क्रिप्टो करन्सी देण्यासाठी दबाव टाकतात.

जर युजर त्या अ‍ॅपच्या माध्यमातून पैसे काढण्याचा प्रयत्न करेल किंवा पुन्हा खाते बंद करू इच्छित असेल तर हॅकर्स त्याचे कनेक्शनच बंद करेल. यामध्ये अ‍ॅक्सेस ब्लॉक करण्याशिवाय इतर माध्यमांचा समावेश आहे. इतर प्रकरणात बोगस वेबसाईटच्या माध्यमातून विश्वासार्ह ब्रँड घेण्याचा सल्ला दिला जातो. हे हॅकर्स iOS वर बोगस स्टोअर बनवतात. म्हणजे एकदा यामध्ये अडकले तर वाचणे अवघड होते.