‘डोकं किती चालतं’ हे तपासण्याची चीप ‘लाॅंच’, केवळ विचार केल्यावर मोबाईल थेट ‘डॅडी’ला फोन लावेल

पोलीसनामा ऑनलाईन टीम – मागील अनेक वर्षांपासून मेंदूमध्ये चालणाऱ्या विचारांचा वेध घेणारी मशीन आणि चीप यासंदर्भात चर्चा मोठ्या सातत्याने प्रमाणावर होत आहेत. मेंदूमध्ये नेमके काय चाले आहे हे शोधून काढणाऱ्या मशिनचे अनेक नमुने देखील आत्तापर्यंत शास्त्रज्ञांनी सादर केले होते. परंतु आता पहिल्यांदाच चीनमधील शास्त्रज्ञांनी एक अशी चिप तयार केली आहे जी मानवी मेंदुमध्ये नेमके काय चालले आहे ते अचूकपणे ओळखू शकेल.

या अनोख्या चिपच्या संशोधकांचे असे म्हणणे आहे की या चीपच्या मदतीने मानवाच्या मेंदूमध्ये नेमके काय चालले आहे आणि व्यक्ती काय विचार करत आहे ते कळू शकते. इतकेच नाही तर या चीपच्या मदतीने वापरकर्ता केवळ आपल्या मेंदूमध्ये विचार करून आपला स्मार्टफोन हाताळू शकेल. हि चिप मेंदूत चालणाऱ्या विद्युतलहरींच्या मदतीने काम करणार असून त्यातून मिळणाऱ्या सांकेतिक मजकुराचे रूपांतर संगणकाच्या साहाय्याने करता येईल. या विशेष चिप ला शास्त्रज्ञांनी ‘ब्रेन टॉकर’ असे नाव दिले आहे. या चिप चे प्रात्यक्षिक नुकतेच चीनमध्ये झालेल्या ‘वर्ल्ड इंटेलिजन्स काँग्रेस’ मध्ये दाखविण्यात आले.

कोणी तयार केली हि चिप :
चायना इलेक्ट्रॉनिक कार्पोरेशन आणि तियानजिन युनिव्हर्सिटी या चीनमधील दोन प्रथितयश संस्थांनी मिळून ही चीप तयार करण्यात यश मिळविले आहे. संशोधकांच्या म्हणण्यानुसार भविष्यात हि चीप दिव्यांगांसाठी मोठा आधार ठरणार असून त्यांच्यासाठी हि चीप म्हणजे जणूकाही वरदानच असेल. या चीपच्या मदतीने आजारी व्यक्ती केवळ आपल्या डोक्यामधील विचारांच्या साहाय्याने व्हीलचेअर चा वापर करू शकेल. अशा प्रकारे अनेक दैनंदिन कामामध्ये या चीपचा प्रभाविपणे वापर करता येऊ शकेल.

आरोग्य विषयक वृत –
राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा निर्णय ; जुन्या आजारामुळे विम्याचा दावा नाकारता येणार नाही

दिवसभरात ३ कपांपेक्षा जास्त चहा पिऊ नका, ‘हे’ होतील दुष्परिणाम

लसणाच्या सालीत आहेत ‘हे’ खास गुणधर्म, होतात खास फायदे