Facebook संबंधित ही ‘चूक’ वाढवू शकते तुमची ‘डोकेदुखी’, तात्काळ करा ‘ही’ सेटिंग
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Facebook चा वापर आपण सगळेच नेहमीच करतो. परंतु आपण अशा काही छोट्या छोट्या चूका नकळत करुन बसतो की आपली सुरक्षा (सिक्युरिटी) धोक्यात येते. अनेकदा आपण आपले फेसबुक अकाऊंट सायबर कॅफे किंवा एखाद्या मित्राच्या फोनमध्ये ओपन करतो आणि ते लॉग आऊट करणं विसरुन जातो. हे तुमच्यासाठी खूप धोकादायक ठरु शकतं. कारण जर याचा कोणी गैरवापर केला तर तुमची सुरक्षा धोक्यात येऊ शकते. त्यामुळे केव्हाही हे पाहणे आवश्यक आहे की तुम्ही तुमचे फेसबुक अकाऊंट लॉग आऊट केले आहे की नाही.
परंतु तुम्ही फेसबुकवर अशी काही सेटिंग करु शकतात ज्याने तुम्ही तुमचे अकाऊंट कुठे ओपन झाले आहे हे पाहू शकतात. यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
स्मार्टफोनवर अशी करा सेटिंग –
सर्वात आधी स्मार्टफोनमध्ये तुमचे फेसबुक अकाऊंट ओपन करा. यानंतर Settings and Privacy हा पर्यायामध्ये जाऊन Security and login या पर्यायावर क्लिक करा. यानंंतर Where you’re logged in हा पर्याय तुम्हाला दिसेल. येथे तुम्ही See all वर क्लिक करु शकतात. येथे तुम्हाला त्या सर्व डिव्हाइसची लिस्ट दिसेल जेथे तुमचे अकाऊंट लॉग इन झालेले आहे. जेथे तुमचे अकाऊंट ओपन दिसत असेल तर त्यापुढे दिसणाऱ्या 3 डॉटवर क्लिक करा. येथे तुम्हाला लॉग आऊटचा पर्याय दिसेल. यावर क्लिक करुन तुम्ही तुमचे अकाऊंट त्या डिव्हाइसमधून लॉग आऊट करु शकतात. याशिवाय तुम्ही Log out of all sessions या पर्यायावर क्लिक करुन सर्व सुरु असलेले अकाऊंट लॉग आऊट करु शकतात.
डेस्कटॉपवर अशा प्रकारे करा सेटिंग्स –
यासाठी तुम्हाला डेस्क टॉपवर फेसबुक लॉग इन करावे लागेल. यानंतर Settings and Privacy हा पर्यायामध्ये जाऊन Security and login या पर्यायावर क्लिक करु शकतात. यानंंतर Where you’re logged in हा पर्याय तुम्हाला दिसेल. येथे तुम्ही See all वर क्लिक करु शकतात. येथे तुम्हाला त्या सर्व डिव्हाइसची लिस्ट दिसेल जेथे तुमचे अकाऊंट लॉगइन झालेले आहे. जेथे तुमचे अकाऊंट ओपन दिसत असले तर त्यापुढे दिसणाऱ्या 3 डॉटवर क्लिक करा. येथे तुम्हाला लॉग आऊटचा पर्याय दिसेल. यावर क्लिक करुन तुम्ही तुमचे अकाऊंट त्या डिव्हाइसवरुन लॉग आऊट करु शकतात. याशिवाय तुम्ही Log out of all sessions या पर्यायावर क्लिक करुन सर्व सुरु असलेले अकाऊंट लॉग आऊट करु शकतात.