आता व्हॉट्सॲप कॉलही करता येणार रेकॉर्ड

न्यूयॉर्क : पोलीसनामा ऑनलाईन – सोशल नेट्वर्किंग साईट्स पैकी सर्वाधिक लोकप्रिय सोशल नेट्वर्किंग साईटस म्हणजे व्हॉट्सॲप. व्हॉट्सॲपने आपल्या ग्राहकांकरिता नेहमी नवनवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न केला आहे. व्हॉट्सअ‍ॅपने काही महिन्यांपूर्वी आपल्या युजर्सना व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे युजर्सना संवाद साधनं आणखी सोपं झालं. युजर्सना स्मार्टफोनवर एखादा व्हॉईस कॉल रेकॉर्ड करण्याची सुविधा असते. आता व्हॉट्सअ‍ॅपवरही अशा पद्धतीने व्हॉईस कॉल रेकॉर्ड करता येईल. व्हॉईस कॉल रेकॉर्ड करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपने कोणतही नवीन फीचर आणलेलं नाही तर थर्ड पार्टी अ‍ॅपच्या मदतीने कॉल रेकॉर्ड करता येणार आहे.

आता अवघ्या एका क्लिकवर कॉल रेकॉर्ड करता येणार आहे. ही सुविधा अँड्रॉईड आणि आयफोन अशा दोन्ही सिस्टीमवर उपलब्ध असेल. मात्र, हा कॉल रेकॉर्ड करताना तुम्हाला समोरच्या व्यक्तीची परवानगी घ्यावी लागणार आहे.

पाहुया हा कॉल कसा रेकॉर्ड करायचा –

मॅक आणि आयफोनच्या माध्यमातून अँड्रॉईड / आयफोनवर कॉल रेकॉर्ड करण्याची पद्धत

सर्वप्रथम आयफोन लायटिंग केबलच्या साहाय्याने मॅकशी जोडा
आता आयफोनवर ‘Trust This Computer’ हा पर्याय निवडा. हा पर्याय तेव्हाच विचारला जातो जेव्हा पहिल्यांदाच फोन मॅकला जोडण्यात येतो.
त्यानंतर मॅकवर ‘QuickTime’ सुरू करा.
Quick Time मध्ये रेकॉर्ड या बटणाच्या खाली दिसणाऱ्या बाणावर वर क्लिक करत आयफोनचा पर्याय निवडा.
Quick Time मध्ये रेकॉर्ड बटणावर क्लिक करा.
आयफोनच्या मदतीने व्हॉट्सअप कॉल करा.
कॉल कनेक्ट झाल्यानंतर Add User Icon वर क्लिक करा. यानंतर तुम्हाला ज्या व्यक्तीशी बोलायचे आहे आणि तिचा कॉल रेकॉर्ड करायचा आहे त्या व्यक्तीचं नाव निवडा.
बोलणं झाल्यावर फोन डिस्कनेक्ट करा
आता Quick Time मध्ये जाऊन रेकॉर्डिंग थांबवा आणि ही फाईल मॅकमध्ये सेव्ह करा.

याशिवाय Cube Call Recorder च्या सहाय्यानेही अँड्रॉईड फोनवर व्हॉट्सअॅप कॉल रेकॉर्डिंग करता येते. मात्र, ही सुविधा सर्व फोनवर उपलब्ध नसते