तुमचा मोबाईल चोरीचा आहे की नाही ? ‘या’ सोप्या पद्धतीने जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   भारतीय बाजार जगातील मोठ्या स्मार्टफोन बाजारामधील एक आहे. येथील टेक कंपन्या बजेटपासून प्रीमियम रेंजपर्यंत स्मार्टफोन लॉंच करतात. परंतू काही वेळेस असे होते की, ग्राहकांना नकली अथवा चोरी केलेले स्मार्टफोन मिळतात. याबद्धल ग्राहकांना काही माहीत नसते. यासाठी आज आम्ही खास तीन पद्धती सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्हाला तुमचा फोन खरा आहे की बनावट हे कळेल. चला जाणून घेऊया…

जर तुम्हाला जाणून घ्याचे असेल की, तुमचा फोन चोरीचा आहे की नाही, तर तुम्ही डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन https://ceir.gov.in/Device/CeirIMELVeification.jsp या वेबसाईटवर जाऊन माहिती घेऊ शकता. येथे तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक, ओटीपी आणि आईएमईआय नंबर टाकावा लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या फोन संबंधित सर्व माहिती मिळेल.

तुम्हाला sms द्वारे कळेल की तुमचा फोन खरा आहे अथवा नाही. यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये KYC लिहून स्पेस द्या आणि १५ डिजिट आयएमआय नंबर एंटर करून १४४२२ वर पाठवा. त्यानंतर तुमच्याजवळ एक sms येईल. ज्यामध्ये फोन आणि त्यासंबंधित सर्व माहिती असेल. जर मॅसेज आणि वेबसाईटमध्ये IMEI IS VALID लिहले असेल तर तुमचा फोन चोरीचा नाही.

तुम्ही KYM- know your mobile ऍपच्या माध्यमातून तुम्ही चेक करू शकता की, तुमचा फोन चोरीचा आहे की नाही. या ऍपच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या फोनशी संबंधित सर्व माहिती मिळेल. जे तुम्हाला या माहितीमध्ये मोबाईलचा आयएमआय नंबर दाखवला नाही अथवा ब्लँक लिहून येत असेल तर तुमचा मोबाईल चोरीचा आहे.

गेल्या वर्षी चिनी मोबाईलची जास्त विक्री

गेल्या वर्षी चिनी स्मार्टफोनची सर्वात जास्त विक्री झाली आहे. रिसर्च फर्म canalys च्या रिपोर्टद्वारे सप्टेंबर तिमाहीमध्ये स्मार्टफोनच्या एकून विक्रीमध्ये चिनी स्मार्टफोनचा मार्केट शेयर ७६ % राहिला, जो स्मार्टफोनच्या शिपमेंटच्या बाबतीत हा विक्रम ठरला आहे. canalys च्या रिपोर्टनुसार गेल्यावर्षी सप्टेंबर तिमाहीच्या तुलनेत यावर्षी स्मार्टफोन शिपमेंटमध्ये ८ % ची वाढ नोंदवली गेली आहे. येथे गेल्या सप्टेंबरच्या तिमाहीत ४ करोड फोन विकले गेले.

जर टॉप ५ स्मार्टफोन शिपमेंटची चर्चा केली तर या लिस्टमध्ये xiaomi टॉप पोजीशनवर आहे. त्यातच साऊथ कोरियन कंपनी samsung दुसऱ्या नंबरवर आहे. या लिस्टमध्ये तिसऱ्या क्रमांकावर चिनी कंपनी विवोने स्थान मिळवले आहे. तर चौथ्या स्थानी चिनी कंपनी realme आहे. शेवटच्या पाचव्या स्थानी चिनी कंपनी ओप्पो आहे. म्हणजेच टॉप ५ स्मार्टफोन शिपमेंटमध्ये samsung सोडून सर्व चिनी कंपनी आहेत.