आपल्या खात्यावर गॅस अनुदानाचे पैसे येताहेत की नाही, ‘या’ सोप्या स्टेप्सद्वारे तपासा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   आज घरोघरी एलपीजी कनेक्शन आहे. त्यात बरेच लोक सरकारद्वारे गॅस सिलिंडरवरील अनुदानाचा लाभ घेत आहेत. अशा परिस्थितीत आपल्यालाही गॅस सिलिंडरवरील अनुदान खात्यात ट्रान्सफर केले जात आहे की नाही हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे. यासाठी एक सोपा मार्ग आहे, ज्याद्वारे आपण तपासू शकता कि गॅस अनुदानाचे पैसे आपल्या खात्यात हस्तांतरित केले गेले आहेत की नाही.

– यासाठी सर्वात आधी www.mylpg.in वेबसाइटवर जा. येथे आपल्याला उजवीकडे गॅस कंपनीचे चित्र दिसेल, आपल्या सेवा प्रदात्याचे गॅस सिलेंडर निवडा.

– आता आपल्या स्क्रीनवर एक नवीन विंडो उघडेल. येथे उजव्या बाजूला साइन-इन आणि न्यू युजरचा पर्याय उपलब्ध असेल. जर आपला आयडी असेल तर साइन इन करा, अन्यथा आपण न्यू युजरवर जाऊन आयडी तयार करुन लॉग इन करू शकता.

– जर LPG ID माहित नसेल तर ‘ Click here to know your LPG ID’ वर क्लिक करा. आपला नोंदणीकृत मोबाइल नंबर, एलपीजी ग्राहक आयडी, राज्याचे नाव, वितरक माहिती येथे प्रविष्ट करा. कॅप्चाकोड प्रविष्ट केल्यानंतर प्रोसेस बटणावर क्लिक करा. आता जे नवीन पेज उघडेल, त्यावर आपला LPG ID स्पष्टपणे दिसून येईल.

– एका पॉप-अप वर आपल्या खऱ्याचा तपशील पाहायला मिळेल. येथे आपले बँक खाते आणि आधार आपल्या एलपीजी खात्याशी लिंक केले आहे की नाही हे नमूद केले जाईल. तसेच आपण अनुदानाचा पर्याय सोडला आहे की नाही याची देखील माहिती मिळेल.

– पेजच्या उजव्या बाजूला ‘सिलेंडर बुकिंग हिस्ट्री / सब्सिडी ट्रान्सफर पहा’ वर क्लिक करा. येथे आपल्याला अनुदानाची रक्कम दिसेल. इतकेच नाही तर गेल्या अनेक महिन्यांपासून बुक केलेल्या सिलिंडरवरील अनुदानाचीही माहिती मिळेल.

– जर आपल्याला खात्यात अनुदान मिळाले नसेल तर आपण फीडबॅक पर्यायावर जाऊन तक्रार नोंदवू शकता. तसेच, आपण 18002333555 वर विनामूल्य कॉल करून तक्रार नोंदवू शकता.

– जर आपण अद्याप आपला एलपीजी आयडी खात्याशी लिंक केलेला नसेल तर आपण थेट वितरकाला भेट देऊन एलपीजी आयडीशी खाते लिंक करू शकता.