WhatsApp च्या नव्या मॅसेंजर रूम सर्व्हिसद्वारे अशाप्रकारे एकाचवेळी 50 जणांशी संपर्कात राहा, जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्त संस्था – Facebook च्या मालकीचे इंस्टंट मॅसेजिंग अॅप व्हॉट्सअप नवनवीन फीचर्स सतत आणत आहे. काही दिवसांपूवी व्हॉट्सअपमध्ये नवीन मॅसेंजर रूम सर्व्हिस सुरू करण्यात आली आहे. या नव्या फीचरद्वारे एकाच वेळी 50 लोकांची बोलता येऊ शकते. सध्या कोरोना महामारीमुळे बहुतांश लोक वर्क फ्रॉम होम करत आहेत.
अशावेळी हे नवे फीचर यूजर्सला आपल्या ऑफिस कलिग्स किंवा मित्रांशी कनेक्ट होण्यास खुप मदत करू शकते. याद्वारे मित्र आणि ओळखीच्यांमधील कम्युनिकेशन गॅप्स भरून काढता येऊ शकतात. कारण कोरोना व्हायरसमुळे लोक बाहेर कमी पडत आहेत. ज्यामुळे लोकांच्यामध्ये भेटणे कमी झाले आहे. अशावेळी ही सर्व्हिस लोकांसाठी खुप उपयोगी ठरू शकते.
आता तुम्ही विचार करत असाल की, या नव्या सर्व्हिसचा वापर कसा करायचा ? ही नवी सेवा वापरण्यासाठी प्रथम तुम्हाला एक रूम क्रिएट करावा लागेल. यानंतर तुम्ही तुमचे मित्र आणि ओळखीच्यांशी कनेक्ट होऊ शकता. मॅसेंजर रूम क्रिएट करण्यासाठी सर्वात महत्वाचे आहे की, तुमच्याजवळ फेसबुक अकाऊंट असले पहिजे. सोबतच तुमच्या स्मार्टफोनमध्ये मॅसेंजरचे लेटेस्ट वर्जन डाऊनलोड केलेले पाहिजे. यानंतर तुम्ही मॅसेंजर रूम क्रिएट करू शकता.
व्हॉट्सअपच्या फॅक्ट पेजनुसार, मॅसेंजर रूम क्रिएट करण्यासाठी सर्वप्रथम व्हॉट्सअप ओपन करा आणि त्यानंतर तुम्हाला कॉल टॅबमध्ये जावे लागेल. कॉल टॅबमध्ये गेल्यानंतर तुम्हाला क्रिएट रूमचे ऑपशन दिसेल. ज्यावर क्लिक केल्यानंतर मॅसेंजर ऑपशनमध्ये जाऊन कंटीन्यू वर क्लिक करा. असे करताच हे आपल्याला मोबाइल ब्राऊजरद्वारे मॅसेंजर अॅप किंवा मॅसेंजरच्या वेबसाईटवर रीडायरेक्ट करेल. हे अशासाठी की, हे फीचर व्हॉट्सअपच्या बाहेर काम करते. यानंतर ट्राय इट वर टॅप करा.
ट्राय इटवर टॅप करताच तुम्हाला क्रिएट रूमवर टॅप करावे लागेल. ज्यानंतर रूमचे नाव टाका. यानंतर सेंड लिंक ऑन व्हॉट्सअपवर क्लिक करा. यानंतर व्हॉट्सअप री-ओपन होईल. व्हॉट्सअप री-ओपन होताच, तुम्ही तुमच्या आवडीच्या कॉन्टॅक्टला यामध्ये सहभागी करून घेऊ शकता. जर, तुम्हाला कोणाबरोबर या मॅसेंजर रूमची लिंक शेयर करायची असेल तर ग्रुप चॅटमध्ये जाऊन शेयर करू शकता.
फेसबुक मॅसेंजर अॅपमध्ये रूम क्रिएट करणे खुप सोपे आहे. यासाठी तुम्हाला पीपल्सच्या टॅबमध्ये जावे लागेल. येथे तुम्हाला रूम क्रिएट करण्याचे ऑपशन दिसेल. एकदा रूम क्रिएट झाल्यास तुम्ही तुमच्या ओळखीच्यांना, मित्रांना इत्यादींना लिंक पाठवून मॅसेंजरमध्ये इनव्हाईट करू शकता. अशाप्रकारे तुम्ही एकाचवेळी 50 लोकांशी व्हिडिओ कॉलद्वारे कनेक्ट होऊ शकता.