जर तुम्हाला दुसर्‍या युजरचं WhatsApp स्टेटस पडले पसंत, तर असं करा ‘डाऊनलोड’

Whatsapp आपल्या यूजर्सच्या सुविधेसाठी नवनवीन फिचर्स सादर करत असते. या सर्वात खास व्हॉट्सअप स्टेटस फिचर आहे. यूजर्स या फिचरद्वारे मॉर्निंग विशेष, कोट्स, फोटो आणि व्हिडिओ शेयर करतात. परंतु या फिचरची सर्वात मोठी कमतरता ही आहे की, व्हॉट्सअप स्टेटस डाऊनलोड करता येत नाही. परंतु. आज आम्ही तुम्हाला एक अशी ट्रिक सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही सहज व्हॉट्सअप स्टेटस डाऊनलोड करू शकता. जाणून घेवूयात…

असे करा डाऊनलोकड

1 सर्वप्रथम आपल्या फोनमध्ये Status downloader for Whatsapp अ‍ॅप इन्स्टॉल करा.

2 आता तुम्ही अ‍ॅप ओपन करता, येथे दोन पर्याय दिसतील. पहिला क्लिक टू चॅट आणि दूसरा स्टेटस डाऊनलोडर. यापैकी दुसर्‍या पर्यायावर क्लिक करा.

3 येथे तुम्हाला सर्व फोटो आणि व्हिडिओ दिसतील, जे व्हॉट्सअपवर यूजर्सने नुकतीच शेयर केले होते.

4 आता तुम्हाला जो फोटो किंवा व्हिडिओ डाऊनलोड करायचा आहे, त्यावर क्लिक करा.

5 क्लिक करताच फोटो किंवा व्हिडिओ फाईल मॅनेजरमधील स्टेटस डाऊनलोडर फोल्डरमध्ये जाऊन स्टोअर होईल.

नोट : ही ट्रिक केवळ अँड्रॉयड यूजर्ससाठी आहे. याशिवाय ही ट्रिक आपल्या रिस्कवर अवलंबावी. कारण स्टेटस डाऊनलोड करण्यासाठी तुम्ही थर्डपार्टी अ‍ॅपची मदत घेत आहात.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like